Gram Panchayat Elections

ग्रामपंचायत निवडणुकांना पुन्हा विलंबाची शक्यता; SIR मुळे निवडणूक कार्यक्रम लांबणीवर?

SIR प्रक्रियेमुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबण्याची शक्यता; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी, तर जानेवारी २०२७ मध्ये निवडणुकीची शक्यता.

ग्रामपंचायत निवडणुकांना पुन्हा विलंबाची शक्यता; SIR मुळे निवडणूक कार्यक्रम लांबणीवर?

Gram Panchayat Elections

४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी; नोव्हेंबर किंवा डिसेंबरअखेर निवडणूक जाहीर होण्याची शक्यता, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या वेळापत्रकाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षणाची SIR प्रक्रिया सुरू असल्याने ग्रामपंचायत निवडणुकांना विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रक्रियेतील हरकती आणि सुनावण्या पूर्ण झाल्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरअखेर जाहीर होण्याची शक्यता असून, गावांच्या नव्या कारभाऱ्यांसाठी जानेवारी २०२७ पर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.

SIR अंतर्गत मतदार याद्यांचे विशेष पुनर्निरीक्षण पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्व हरकती आणि सुनावण्या पार पडल्यानंतर ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका जानेवारी २०२७ मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मतदार यादीच्या या प्रक्रियेचा निवडणूक कार्यक्रमावर नेमका किती परिणाम होणार, ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलल्या जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणुका लांबण्याची शक्यता असतानाच मुदत संपलेल्या आणि निवडणुका प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींच्या कारभारासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कार्यकारणीचा कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सध्या निवडून आलेले प्रतिनिधी नसल्याने गावातील विकासकामे तसेच महत्त्वाचे प्रकल्प संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे.

ही परिस्थिती लक्षात घेता, निवडणुका होईपर्यंत किंवा पुढील ६ महिन्यांपर्यंत ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत सुरू राहावा, यासाठी प्रशासक नियुक्त करण्याचा मार्ग सरकारने मोकळा केला आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचे प्रशासन आता प्रशासकांच्या माध्यमातून चालवले जाणार आहे.

गावपातळीवरील विकासकामांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, विकासकामे रखडत असल्याने ग्रामपंचायत निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्यात, अशी मागणीही होत आहे. त्यामुळे SIR प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोग आणि शासनाकडून पुढील काय निर्णय घेतला जातो, याकडे राज्यातील ग्रामपंचायतींचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

सुधारित Form 6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नसल्याचे CJI सूर्यकांत यांनी स्पष्ट केले. SIRच्या १४ निर्णयांवर याचिकेत सवाल; निवडणूक आयोगाला नोटीस.

Oct 05, 2026
SIRच्या १४ निर्णयांवरून ज्ञानेश कुमार अडचणीत? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

SIRच्या १४ निर्णयांवरून ज्ञानेश कुमार अडचणीत? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

CEC ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाच्या मागणीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने अंतरिम आदेशास नकार देत निवडणूक आयोग आणि केंद्राला नोटीस बजावली.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026