‘रील स्टार’सह पोलिसांचा कट? महिला प्राचार्याला धमकी देऊन ७ लाख उकळले

पोलिस यंत्रणेला धक्का देणारी एक गंभीर घटना समोर आली असून, एका महिला प्राचार्याला गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत लाखोंची खंडणी उकळल्याचा आरोप थेट काही पोलिस कर्मचाऱ्यांवरच झाला आहे.

‘रील स्टार’सह पोलिसांचा कट? महिला प्राचार्याला धमकी देऊन ७ लाख उकळले

Extortion Racket

पुण्यात पोलिसांवरच खंडणीचा आरोप ;पुणे पोलिसांच्या प्रतिमेला धक्का

पुणे (Extortion Racket) : शहरातील पोलिस यंत्रणेला धक्का देणारी एक गंभीर घटना समोर आली असून, एका महिला प्राचार्याला गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत लाखोंची खंडणी उकळल्याचा आरोप थेट काही पोलिस कर्मचाऱ्यांवरच झाला आहे. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, कर्मचारी सुदाम तायडे, दामिनी पथकातील काही कर्मचारी आणि सोशल मीडियावर ‘रील स्टार’ म्हणून ओळखली जाणारी सोनाली हिंगे यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आहे. संबंधितांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने महिला प्राचार्याला लक्ष्य केले. तिच्याविरुद्ध ‘POCSO’ अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती दाखवत मानसिक दबाव निर्माण करण्यात आला.

या भीतीचा फायदा घेत आरोपींनी पीडितेकडून हप्त्यांमध्ये सुमारे ७ लाख रुपये उकळल्याचे उघड झाले आहे. यामध्ये सोनाली हिंगे हिचा वापर करून विश्वास संपादन करण्यात आल्याचीही माहिती पुढे आली असून, त्यामुळे या कटाची तीव्रता अधिक वाढली आहे.

दरम्यान, अजित बडे हे सध्या सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत, तर सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे हे शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. या तिघांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसच खंडणी प्रकरणात अडकले असल्याने संपूर्ण पोलिस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला? सोलापूरमार्गे धावणार; पश्चिम महाराष्ट्रातील शहरांचा पत्ता कट

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला? सोलापूरमार्गे धावणार; पश्चिम महाराष्ट्रातील शहरांचा पत्ता कट

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारत पुणे-सोलापूरमार्गे धावण्याचा प्रस्ताव आहे. सुमारे 16 तासांचा प्रवास, सहा दिवस सेवा आणि सात प्रस्तावित थांबे असतील.

Oct 04, 2026