परिवर्तन शेतकरी संघटनेची मागणी; कॅबिनेट बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन!
मानोरा (Amravati-Pusad National Highway) : गाव, वाडी - वस्ती, शहर हि एकमेकांना जोडून रस्ते इमारती फुल विकासाचे पहिले पाऊल हे ब्रिंद घेऊन आज समृध्दी, राष्ट्रीय महामार्ग व तिर्थक्षेत्र महामार्गाची निर्मिती होत असताना दुसरीकडे अती महत्त्वाकांक्षी अमरावती - पुसद वरुन फक्त ६७० कि.मी.चा भोपाळ - हैद्राबाद या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग दर्जा देऊन भोपाळ - हैदराबाद महामार्ग बांधकाम सुरू करण्याची मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी शासनाकडे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. राज्याच्या काॅबिनेट बैठकीत हा ठराव घेऊन या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग दर्जा देऊन कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांना जोडणारा महत्त्वाकांक्षी रस्त्याची निर्मिती करत सोईचा प्रकल्प महायुतीत शासनाने करणे गरजेचे आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात पुसद - अमरावती विभागीय कार्यालय अमरावती येथे ये - जा करण्यासाठी शासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांना विद्यापीठ च्या कामासाठी सोयीची एस टी बसं सुरू होती याचं बसने हैदराबाद चे व्यावसायीक नांदेड वरुन पुसद - कारंजा - अमरावती मार्गाने मध्यप्रदेश भोपाळ मार्गक्रमणा करीत असत सन १९८४ पासून अमरावती - पुसद हि बसं अमरावती - कारंजा - मानोरा फुलउमरी गहुंली पुसद सुरू झाली होती.आताही अमरावती - कारंजा पोहरादेवी - सिंगद मार्गे ही बस सुरू आहे.आता मात्र भोपाळ - हैदराबाद हा महामार्ग निर्माण करुन देशातील सर्वात कमी ६७० कि मी अंतर चा राष्ट्रीय महामार्ग निर्माती करून कर्नाटक,आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र व मध्य प्रदेश अशा पाच राज्यांना जोडणाऱ्या या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग दर्जा देण्याची मागणी मागील तीन वर्षांपासून शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी लावून धरली आहे.
इंग्रज काळात अमरावती शहर शिक्षण व व्यापारासाठी महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांनमधले मुख्य बाजारपेठेचे शहर होते. त्याकाळी अमरावती - पुसद या रस्त्याने आंध्रा कर्नाटक मधील व्यापारी मध्य प्रदेश मधील भोपाळ येथे सामानाची यातायात करत व्यापार करायचे तत्कालीन अकोला जिल्ह्यात कपड्याचे व्यापारी म्हणून प्रसिद्ध असणारे धर्मा नाईक यांनी घोड्यावर कपड्याचा व्यापार केलेला आहे.
ते सांगत की अमरावती हे मोठे बाजारपेठ होते भोपाळ येथील व्यापारी अमरावतीच्या बाजारपेठेत आपला माल विक्रीसाठी आणायचे तेव्हा वाहनाची कुठली साधनसामग्री नसल्याने आमचा लोकव्यापार घोडा गाडी, बैलगाडी तर काहींचे उंट वा हत्तींच्या पाठीवर मालाची यातायात व्हायची नांदेड - पुसद - कारंजा - अमरावती हा गहुली फुलंउमरी मार्गे ये - जा करण्यासाठी वापरला जात असल्याचे धर्मा नाईक यांनी अनेक वेळा सांगितल्याचे निवेदनात मनोहर राठोड यांनी मांडले आहे तेव्हा हा राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जा देऊन भोपाळ हैदराबाद या नवीन रस्त्याची निर्मिती करण्याची मागणी ही मनोहर राठोड यांनी लावून धरली आहे.