शेतकरी कर्जमुक्ती योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर

Farm Loan Waiver Scheme: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्य शासनाने 7 ऑगस्ट रोजी पहिल्या टप्प्यातील जिल्हानिहाय वाटप यादी जाहीर केली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर

Farm Loan Waiver Scheme

 

राज्यातील 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांना 5028 कोटींचा लाभ

सुधीर गोगटे 
हिंगोली (Farm Loan Waiver Scheme) :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्य शासनाने 7 ऑगस्ट रोजी पहिल्या टप्प्यातील जिल्हानिहाय वाटप यादी जाहीर केली आहे. या यादीत राज्यातील एकूण 6 लाख 22 हजार 207 शेतकऱ्यांना 5028 कोटी 70 लाख 38 हजार 206 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

अमरावती विभागात सर्वाधिक 1 लाख 58 हजार 146 शेतकऱ्यांना 1372 कोटी 17 लाख 84 हजार 290 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 43 हजार 647 शेतकऱ्यांना 374 कोटी 31 लाख 43 हजार 481 रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील 34 हजार 855 शेतकऱ्यांना 295 कोटी 47 लाख 12 हजार 122 रुपये, अमरावती जिल्ह्यातील 33 हजार 401 शेतकऱ्यांना 308 कोटी 16 लाख 27 हजार 28 रुपये, वाशिम जिल्ह्यातील 26 हजार 333 शेतकऱ्यांना 224 कोटी 86 लाख 52 हजार 768 रुपये आणि अकोला जिल्ह्यातील 19 हजार 910 शेतकऱ्यांना 169 कोटी 36 लाख 48 हजार 890 रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात 1 लाख 30 हजार 934 शेतकऱ्यांसाठी 932 कोटी 60 लाख 69 हजार 870 रुपयांची तरतूद झाली आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 35 हजार 540 शेतकऱ्यांना 231 कोटी 15 लाख 54 हजार 91 रुपये, लातूर जिल्ह्यात 22 हजार 963 शेतकऱ्यांना 159 कोटी 95 लाख 81 हजार 623 रुपये, जालना जिल्ह्यात 18 हजार 792 शेतकऱ्यांना 116 कोटी 4 लाख 88 हजार 557 रुपये, बीड जिल्ह्यात 13 हजार 110 शेतकऱ्यांना 90 कोटी 74 लाख 63 हजार 325 रुपये, नांदेड जिल्ह्यात 12 हजार 929 शेतकऱ्यांना 106 कोटी 24 लाख 98 हजार 231 रुपये, धाराशिव जिल्ह्यात 12 हजार 214 शेतकऱ्यांना 105 कोटी 86 लाख 54 हजार 704 रुपये, परभणी जिल्ह्यात 7 हजार 870 शेतकऱ्यांना 60 कोटी 4 लाख 10 हजार 966 रुपये आणि हिंगोली जिल्ह्यात 7 हजार 516 शेतकऱ्यांना 62 कोटी 54 लाख 18 हजार 374 रुपये मंजूर झाले आहेत.

नाशिक विभागात 1 लाख 40 हजार 89 शेतकऱ्यांना 1209 कोटी 38 लाख 72 हजार 456 रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील 73 हजार 42 शेतकऱ्यांना 702 कोटी 54 लाख 51 हजार 701 रुपये मिळाले असून हा आकडा राज्यात सर्वाधिक आहे. त्याखालोखाल जळगाव जिल्ह्यात 31 हजार 908 शेतकऱ्यांना 184 कोटी 16 लाख 51 हजार 652 रुपये, नाशिक जिल्ह्यात 20 हजार 341 शेतकऱ्यांना 173 कोटी 69 लाख 93 हजार 287 रुपये, धुळे जिल्ह्यात 9 हजार 20 शेतकऱ्यांना 89 कोटी 74 लाख 51 हजार 955 रुपये आणि नंदुरबार जिल्ह्यात 5 हजार 778 शेतकऱ्यांना 59 कोटी 23 लाख 23 हजार 861 रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

पुणे विभागात 1 लाख 4 हजार 61 शेतकऱ्यांसाठी 860 कोटी 96 लाख 73 हजार 58 रुपये देण्यात आले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात 38 हजार 970 शेतकऱ्यांना 345 कोटी 25 लाख 5 हजार 594 रुपये, सांगली जिल्ह्यात 21 हजार 725 शेतकऱ्यांना 156 कोटी 54 लाख 30 हजार 645 रुपये, सातारा जिल्ह्यात 19 हजार 58 शेतकऱ्यांना 142 कोटी 7 लाख 39 हजार 284 रुपये, सोलापूर जिल्ह्यात 11 हजार 394 शेतकऱ्यांना 128 कोटी 10 लाख 44 हजार 161 रुपये आणि कोल्हापूर जिल्ह्यात 12 हजार 914 शेतकऱ्यांना 88 कोटी 99 लाख 53 हजार 374 रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे.

नागपूर विभागात 70 हजार 290 शेतकऱ्यांना 544 कोटी 70 लाख 54 हजार 130 रुपये देण्यात आले आहेत. यात चंद्रपूर जिल्ह्यात 26 हजार 229 शेतकऱ्यांना 198 कोटी 59 लाख 48 हजार 517 रुपये, गोंदिया जिल्ह्यात 12 हजार 679 शेतकऱ्यांना 75 कोटी 74 लाख 73 हजार 522 रुपये, भंडारा जिल्ह्यात 11 हजार 696 शेतकऱ्यांना 75 कोटी 25 लाख 81 हजार 710 रुपये, वर्धा जिल्ह्यात 10 हजार 635 शेतकऱ्यांना 109 कोटी 91 लाख 16 हजार 505 रुपये, नागपूर जिल्ह्यात 6 हजार 380 शेतकऱ्यांना 70 कोटी 61 हजार 758 रुपये आणि गडचिरोली जिल्ह्यात 2 हजार 671 शेतकऱ्यांना 15 कोटी 18 लाख 72 हजार 118 रुपयांचा निधी समाविष्ट आहे.

कोकण विभागात 18 हजार 687 शेतकऱ्यांसाठी 108 कोटी 85 लाख 84 हजार 401 रुपये मंजूर झाले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यात 6 हजार 950 शेतकऱ्यांना 45 कोटी 53 लाख 38 हजार 677 रुपये, पालघर जिल्ह्यात 5 हजार 169 शेतकऱ्यांना 29 कोटी 20 लाख 43 हजार 4 रुपये, रत्नागिरी जिल्ह्यात 2 हजार 832 शेतकऱ्यांना 12 कोटी 93 लाख 68 हजार 678 रुपये, रायगड जिल्ह्यात 2 हजार 167 शेतकऱ्यांना 13 कोटी 40 लाख 35 हजार 399 रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 हजार 569 शेतकऱ्यांना 7 कोटी 77 लाख 98 हजार 644 रुपयांची मदत देण्यात आली आहे.

शासनाने प्रसिद्ध केलेल्या या पहिल्या यादीमुळे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांसाठी पुढील टप्प्यातील निधी वितरण लवकरच होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

दुसऱ्या टप्प्यात 6.36 लाख शेतकऱ्यांना 5,086 कोटींचा दिलासा, मराठवाडा आघाडीवर

दुसऱ्या टप्प्यात 6.36 लाख शेतकऱ्यांना 5,086 कोटींचा दिलासा, मराठवाडा आघाडीवर

Farm Loan Waiver Scheme: राज्य शासनाच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 च्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वितरणाचा अहवाल 24 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर झाला आहे.

Aug 25, 2026
मयत शेतकऱ्यांच्या वारसांची माहिती पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक

मयत शेतकऱ्यांच्या वारसांची माहिती पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक

Farm Loan Waiver Scheme: शासनाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' हेतूने मृत शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांचे करज खात्यांमधील हक्क नोंदविण्याची प्रक्रिया सुरू

Aug 19, 2026
शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्हा बँकेस १२२ कोटी!

शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्हा बँकेस १२२ कोटी!

Farm Loan Waiver Scheme: मराठवाड्यातील सर्वाधिक रकमेचा लाभ मिळालेल्या लातूर जिल्हा बँकेने कर्जमुक्ती योजने अंतर्गत १८,५८० शेतकर्यांना रु. १२२ कोटी देण्याचे अहवाल दाखवले आहेत.

Aug 09, 2026