हिंगोली (Farm Loan Waiver Scheme) : राज्य शासनाच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 च्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वितरणाचा अहवाल 24 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर झाला आहे. या टप्प्यात राज्यातील 6 लाख 36 हजार 36 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 5 हजार 86 कोटी 30 लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
शासनाने जाहीर केलेल्या जिल्हानिहाय आकडेवारी नुसार या योजनेचा सर्वाधिक लाभ मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. विभागनिहाय वितरणाचा आढावा असा -
1. मराठवाडा विभाग - 2,284 कोटींचा सर्वात मोठा वाटा
मराठवाड्यात एकूण 3 लाख 2 हजार 273 शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यात बीड जिल्ह्यात 53,514 शेतकऱ्यांना 400.32 कोटी, नांदेडमध्ये 51,330 शेतकऱ्यांना 381.94 कोटी, जालना 51,003 शेतकऱ्यांना 366.27 कोटी, परभणी 44,713 शेतकऱ्यांना 348.02 कोटी, छत्रपती संभाजीनगर 39,405 शेतकऱ्यांना 287.32 कोटी, हिंगोली 24,083 शेतकऱ्यांना 195.61 कोटी, धाराशिव 21,793 शेतकऱ्यांना 183.85 कोटी आणि लातूरमध्ये 16,432 शेतकऱ्यांना 121.07 कोटी रुपये जमा झाले आहेत.
2. विदर्भ विभाग - 1,574 कोटी
विदर्भातील 1 लाख 90 हजार 672 शेतकऱ्यांना लाभ मिळाला. यात राज्यात सर्वाधिक निधीचे वितरण बुलढाणा जिल्ह्यात झाले असून 52,529 शेतकऱ्यांना 406.11 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यापाठोपाठ यवतमाळ 34,834 शेतकऱ्यांना 295.58 कोटी, अमरावती 23,944 शेतकऱ्यांना 215.75 कोटी, वाशिम 17,327 शेतकऱ्यांना 150.05 कोटी, अकोला 17,174 शेतकऱ्यांना 140.82 कोटी, वर्धा 12,695 शेतकऱ्यांना 120.90 कोटी, नागपूर 9,554 शेतकऱ्यांना 94.61 कोटी, चंद्रपूर 8,544 शेतकऱ्यांना 64.32 कोटी तर गडचिरोली, भंडारा आणि गोंदियात मिळून 14 हजार शेतकऱ्यांना सुमारे 86 कोटींचे वाटप झाले.
3. उत्तर महाराष्ट्र / खानदेश - 756 कोटी
या विभागात 84,813 शेतकऱ्यांना लाभ मिळाला. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक 42,173 शेतकऱ्यांना 411.48 कोटी, धुळे 10,877 शेतकऱ्यांना 103.64 कोटी, जळगाव 16,701 शेतकऱ्यांना 100.56 कोटी, नाशिक 9,731 शेतकऱ्यांना 86.51 कोटी आणि नंदुरबार 5,331 शेतकऱ्यांना 53.83 कोटी रुपये देण्यात आले.
4. पश्चिम महाराष्ट्र - 417 कोटी
पश्चिम महाराष्ट्रातील 49,224 शेतकरी कर्जमुक्त झाले. पुणे जिल्ह्यात 16,126 शेतकऱ्यांना 138.71 कोटी, सोलापूर 9,317 शेतकऱ्यांना 109.10 कोटी, सांगली 9,369 शेतकऱ्यांना 67.25 कोटी, सातारा 7,514 शेतकऱ्यांना 54.58 कोटी आणि कोल्हापूर 6,898 शेतकऱ्यांना 47.71 कोटी रुपये मिळाले.
5. कोकण विभाग - 54 कोटी
कोकणात तुलनेने कमी लाभार्थी असून 9,054 शेतकऱ्यांना 54.15 कोटी रुपये वितरित करण्यात आले. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा यात समावेश आहे.
दरम्यान, या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून पुढील तिसऱ्या टप्प्यातील वितरण लवकरच केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.