शेतकरी कर्जमुक्ती योजना

शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्हा बँकेस १२२ कोटी!

Farm Loan Waiver Scheme: मराठवाड्यातील सर्वाधिक रकमेचा लाभ मिळालेल्या लातूर जिल्हा बँकेने कर्जमुक्ती योजने अंतर्गत १८,५८० शेतकर्यांना रु. १२२ कोटी देण्याचे अहवाल दाखवले आहेत.

शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्हा बँकेस १२२ कोटी!

Farm Loan Waiver Scheme

 

मराठवाड्यातील सर्वाधिक रक्कम लातूर जिल्हा बँकेला: बँकेचे चेअरमन धीरज देशमुख

लातूर (Farm Loan Waiver Scheme) : नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दि. २ जून २०२६ शासन निर्णयानुसार “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६” जाहीर केली आहे. जिल्हा बँकेचे मार्गदर्शक तथा सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब व राज्याचे सहकारी मंत्री मा.ना. बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेअंतर्गत प्रसिद्ध झालेल्या पहिल्या व दुसऱ्या यादीमध्ये लातूर जिल्हा बँकेचे ३५ हजार ४०९ शेतकरी पात्र ठरलेले असून रु. २१९ कोटी रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्राप्त यादीपैकी आजपर्यंत २५ हजार १३० शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (E-Kyc) पूर्ण केलेले आहे. 

राज्याचे सहकारी मंत्री मा.ना. बाबसाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून आधार प्रमाणीकरण (E-Kyc) पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांपैकी १८५८० शेतकऱ्यांची रु. १२२ कोटी ७१ लाख रक्कम लातूर जिल्हा बँकेस प्राप्त झाली असून मराठवाड्यातील इतर जिल्हा बँकेच्या तुलनेत लातूर जिल्हा बँकेस सर्वाधिक रक्कम मिळाली असल्याचे बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले. सदरील बँकेस मिळालेली रक्कम संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या खाती सोमवारी जमा होऊन त्यांचे कर्जाचे खाते बेबाक करून कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे. तसेच कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आधार प्रमाणीकरण करून घ्यावे:
अजूनही १० हजार २७९ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (E-Kyc) पूर्ण केलेले नाही. (Farm Loan Waiver Scheme) कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी यादीतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले आधार प्रमाणीकरण (E-Kyc) करून घ्यावे तसेच ज्या शेतकऱ्यांनी अजूनही 'ॲग्रीस्टॅक' मंचावर नोंदणी न केल्यामुळे त्यांचा फार्मर आयडी निघाला नाही त्यांनी फार्मर आयडी काढून आधार प्रमाणीकरण (E-Kyc) करून घ्यावे असे आवाहन बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी केलेले आहे.

लातूर जिल्हा बँकेस तालुकानिहाय मिळालेला रक्कमेचा तपशील पुढीलप्रमाणे:
तालुका    शेतकरी संख्या     रक्कम खालील प्रमाणे
अहमदपूर    २७५९      १९ कोटी ६१ लाख
औसा    २८५९        १९ कोटी ०१ लाख
चाकूर    २४२८      १४ कोटी ७६ लाख
देवणी    ९६७       ०५ कोटी ८० लाख
जळकोट    ९७२      ०५ कोटी ९३ लाख
लातूर    १७०७        १२ कोटी २४ लाख
निलंगा    ३३६७       २१ कोटी ८१ लाख
रेणापूर    ६२७        ०४ कोटी २३ लाख
शि.अनंतपाळ    १०५५        ७ कोटी ६१ लाख,
उदगीर    १८३९        ११ कोटी ७१ लाख
एकूण  १८५८०       १२२ कोटी ७१ लाख

संबंधित सामग्री

संभाजीराव का बोलतात अमित देशमुखांविरोधात? लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजपसमोर सवाल

संभाजीराव का बोलतात अमित देशमुखांविरोधात? लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजपसमोर सवाल

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून संभाजीराव पाटील निलंगेकरांची आक्रमक भूमिका चर्चेत. बँकेच्या कारभारावरून अमित देशमुखांवर आरोप आणि भाजपसमोर सवाल.

Sep 23, 2026
दुसऱ्या टप्प्यात 6.36 लाख शेतकऱ्यांना 5,086 कोटींचा दिलासा, मराठवाडा आघाडीवर

दुसऱ्या टप्प्यात 6.36 लाख शेतकऱ्यांना 5,086 कोटींचा दिलासा, मराठवाडा आघाडीवर

Farm Loan Waiver Scheme: राज्य शासनाच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 च्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वितरणाचा अहवाल 24 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर झाला आहे.

Aug 25, 2026
मयत शेतकऱ्यांच्या वारसांची माहिती पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक

मयत शेतकऱ्यांच्या वारसांची माहिती पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक

Farm Loan Waiver Scheme: शासनाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' हेतूने मृत शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांचे करज खात्यांमधील हक्क नोंदविण्याची प्रक्रिया सुरू

Aug 19, 2026