3,160 कोटींचे वाटप; मराठवाडा आघाडीवर
सुधीर गोगटे
हिंगोली (Farm Loan Waiver Scheme) : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 1 ऑक्टोबर 2026 अखेर राज्यातील 3 लाख 27 हजार 250 शेतकऱ्यांच्या खात्यात 3 हजार 160 कोटी 44 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. सहकार विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार एकूण वाटपापैकी 57 टक्के लाभ एकट्या मराठवाडा विभागाला मिळाला आहे.
मराठवाडा विभागात सर्वाधिक लाभ -
छत्रपती संभाजीनगर विभागात 1 लाख 84 हजार 287 शेतकऱ्यांना 1 हजार 807 कोटी 98 लाख रुपयांचा लाभ मिळाला. यामध्ये बीड जिल्ह्यात 43 हजार 72 शेतकऱ्यांना 424.57 कोटी, नांदेड 37 हजार 859 शेतकऱ्यांना 373.38 कोटी, जालना 29 हजार 578 शेतकऱ्यांना 275.91 कोटी, परभणी 28 हजार 635 शेतकऱ्यांना 284.85 कोटी, छत्रपती संभाजीनगर 18 हजार 323 शेतकऱ्यांना 180.43 कोटी, धाराशिव 15 हजार 787 शेतकऱ्यांना 187.48 कोटी, हिंगोली 15 हजार 70 शेतकऱ्यांना 149.39 कोटी आणि लातूर 7 हजार 378 शेतकऱ्यांना 77.20 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे.
विदर्भात 86 हजार शेतकरी कर्जमुक्त -
विदर्भातील दोन्ही विभाग मिळून 86 हजार 459 शेतकऱ्यांना 849.16 कोटी मिळाले. अमरावती विभागात 60 हजार 758 शेतकऱ्यांना 622.55 कोटी - बुलढाणा 27 हजार 507 (280.37 कोटी), यवतमाळ 9 हजार 294 (100.04 कोटी), अकोला 9 हजार 182 (96.72 कोटी), अमरावती 7 हजार 874 (80.04 कोटी), वाशिम 6 हजार 891 (72.07 कोटी).
नागपूर विभागात 25 हजार 701 शेतकऱ्यांना 226.61 कोटी - वर्धा 8 हजार 158 (89.29 कोटी), नागपूर 6 हजार 775 (84.83 कोटी), चंद्रपूर 3 हजार 291 (29.72 कोटी), गोंदिया 2 हजार 762 (21.66 कोटी), गडचिरोली 2 हजार 742 (13.21 कोटी), भंडारा 2 हजार 24 (15.87 कोटी).
उत्तर महाराष्ट्र - 23 हजार शेतकऱ्यांना 208 कोटी
नाशिक विभागात 23 हजार 343 शेतकऱ्यांना 208.90 कोटी - अहिल्यानगर 9 हजार 186 (88.81 कोटी), जळगाव 6 हजार 111 (40.75 कोटी), नाशिक 3 हजार 455 (30.77 कोटी), धुळे 3 हजार 258 (33.09 कोटी), नंदुरबार 1 हजार 393 (14.76 कोटी).
पश्चिम महाराष्ट्र - 19 हजार शेतकऱ्यांना 164 कोटी
पुणे विभागात 19 हजार 278 शेतकऱ्यांना 164.98 कोटी - पुणे 5 हजार 846 (48.88 कोटी), सोलापूर 4 हजार 23 (45.55 कोटी), सांगली 3 हजार 263 (25.41 कोटी), सातारा 3 हजार 123 (23.25 कोटी), कोल्हापूर 2 हजार 843 (19.88 कोटी).
कोकणात 3,685 शेतकऱ्यांना लाभ
कोकण विभागात 3 हजार 685 शेतकऱ्यांना 25.03 कोटी - रायगड 991 (8.81 कोटी), रत्नागिरी 918 (6.03 कोटी), ठाणे 772 (5.65 कोटी), पालघर 526 (3.25 कोटी), सिंधुदुर्ग 478 (3.14 कोटी).राज्यातील एकूण 3,27,250 शेतकऱ्यांना 3,160.44 कोटींचा लाभ मिळाल्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीसाठी नव्याने उभारी घेण्यास मदत होणार आहे.