शेतकरी आत्महत्या 

शेतातील नापिकीमुळे आणखी एक शेतकऱ्याची आत्महत्या 

Farmer Suicides: कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील शेतकऱ्याने शेतातील नापिकीमुळे व कर्ज कसे फेडावे या चिंतेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

शेतातील नापिकीमुळे आणखी एक शेतकऱ्याची आत्महत्या 

Farmer Suicides

आखाडा बाळापूर (Farmer Suicides) : कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील शेतकऱ्याने शेतातील नापिकीमुळे व कर्ज कसे फेडावे या चिंतेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याबाबत आज अकस्मात मृत्यूची नोंद पोलिस स्थानकात करण्यात आली. कळमनुरी तालुक्यातील विविध भागात सातत्याने शेतकरी आत्महत्या घटना घडत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील शेतकरी रावसाहेब बापुराव मगर (वय ५१ वर्षे) यांनी २४ जून रोजी रात्री दोन वाजता जाम शिवारातील शेतातील आखाड्यावर निसर्गाच्या चक्रामुळे शेतातील नापिकीमुळे बॅकेचे कर्ज कसे फेडावे या नैराश्यातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.सदर शेतकऱ्यावर  सन २०१९ ला युनियन बँक ऑफ इंडिया शाखा हिंगोली ७५ हजार रुपये कर्ज घेतले होते.

याबाबत गजानन बापुराव मगर माहितीनुसार अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आला.पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद मरे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील रोहीणकर, बिट प्रमुख सुनील रिठे करत आहेत. कळमनुरी तालुक्यातील विविध भागात सातत्याने शेतकरी आत्महत्या घटना वरचेवर घडत आहेत मागील काही महिन्यात जवळपास पाच सहा शेतकरी आत्महत्या घटना घडलेल्या आहेत.शेतकरी आत्महत्या चिंता वाढवणारे आहे.

संबंधित सामग्री

कळमनुरीत  ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी; भव्य जुलूस कार्यक्रमात हजारो सहभागी 

कळमनुरीत  ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी; भव्य जुलूस कार्यक्रमात हजारो सहभागी 

Kalmanuri Eid-e-Miladunnabi: ईद मिलाद निमित्त शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने आज 26 ऑगस्ट रोजी भव्य मिरवणूक काढीत व विविध धार्मिक कार्यक्रम घेत मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी

Aug 26, 2026
आमदार संतोष बांगर यांच्या कावड यात्रेत हिंदू- मुस्लीम ऐक्याचे दर्शन

आमदार संतोष बांगर यांच्या कावड यात्रेत हिंदू- मुस्लीम ऐक्याचे दर्शन

MLA Santosh Bangar: शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी निघणाऱ्या भव्य कावड यात्रेत यंदाही हिंदू-मुस्लीम ऐक्याचे विलोभनीय दर्शन घडले.

Aug 25, 2026
महिलेचे सोन्याचे गंठन हिसकावून पळणार्‍या चोरट्याच्या दुचाकीचा अपघात; दोघांवर उपचार

महिलेचे सोन्याचे गंठन हिसकावून पळणार्‍या चोरट्याच्या दुचाकीचा अपघात; दोघांवर उपचार

Thief Bike Accident: सोन्याचे गंठन हिसकावून दोन दुचाकीस्वार चोरटे सुसाट वेगाने पसार झाले. मात्र, पळ काढणारे हे चोर काही अंतरावरच रस्ता अपघाताचे बळी ठरले

Aug 06, 2026
उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख रिक्त जागा पदोन्नतीने भरल्याने शैक्षणिक कामकाज सुरळीत 

उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख रिक्त जागा पदोन्नतीने भरल्याने शैक्षणिक कामकाज सुरळीत 

Department of Education: केंद्रीय शिक्षण विभागाने कळमनुरी तालुक्यातील रिक्त पदोंपैकी उच्च श्रेणी मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख पदांचे भरले आहेत. या पदोन्नतीने शाळांतील कामकाज सुटणार,

Jul 28, 2026
शांतता भंग करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाची करडी नजर राहणार

शांतता भंग करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाची करडी नजर राहणार

Kalamanuri Police: 7 जुलैपासून सुरू होणाऱ्या हजरत सरकार नुरुद्दीन नुरी शहीद दर्ग्याच्या उरुस सोहळ्यात पोलिसांनी सहकार्य करीत असून शांतता राखण्यासाठी विशेष उपायोचित

Jul 02, 2026