चोर दुचाकी अपघात

महिलेचे सोन्याचे गंठन हिसकावून पळणार्‍या चोरट्याच्या दुचाकीचा अपघात; दोघांवर उपचार

Thief Bike Accident: सोन्याचे गंठन हिसकावून दोन दुचाकीस्वार चोरटे सुसाट वेगाने पसार झाले. मात्र, पळ काढणारे हे चोर काही अंतरावरच रस्ता अपघाताचे बळी ठरले

महिलेचे सोन्याचे गंठन हिसकावून पळणार्‍या चोरट्याच्या दुचाकीचा अपघात; दोघांवर उपचार

Thief Bike Accident

 

कळमनुरीतील घटना; खिशात सापडला चोरीचा मुद्देमाल

कळमनुरी (Thief Bike Accident) : शहराच्या मुख्य रस्त्यावर रात्री ९ वाजेच्या सुमारास चेन स्नॅचिंगची (गंठन चोरी) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एच.डी.एफ.सी. बँकेसमोर पायी चालणार्‍या कळमनुरी शिवसेना शहर प्रमुखाची पत्नी चे गळ्यातील १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन हिसकावून दोन दुचाकीस्वार चोरटे सुसाट वेगाने पसार झाले. मात्र, पळ काढणारे हे चोर काही अंतरावरच रस्ता अपघाताचे बळी ठरले, ज्यामुळे त्यांचे बिंग फुटले.

रात्री ९ वाजेच्या सुमारास शहरातील मारवाडी गल्ली येथील रहिवासी असलेल्या ५५ वर्षीय संतोषी संतोष सारडा या महिला आपल्या कुटुंबासह मुख्य रस्त्यावरील एच.डी.एफ.सी. बँकेसमोरून पायी जात होत्या. याच दरम्यान मोटार सायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी मोटर सायकल वर येऊन महिलेच्या गळ्यावर झडप घातली आणि सुमारे एक लाख रुपये किमतीचे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे शॉर्ट गंठन (मंगळसूत्र) तोडून तीव्र वेगाने दुचाकीवरून पळ काढला.

या (Thief Bike Accident) अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेली महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी तातडीने कळमनुरी पोलीस ठाणे गाठले. गुन्हा करून पळून जाणार्‍या चोरांची दुचाकी मुख्य रस्त्यावरील रुशदा फंक्शन हॉलसमोर अनियंत्रित होऊन अपघातग्रस्त झाली. रस्ता अपघाताची माहिती मिळताच पोलीस पोलीस निरीक्षक जमीर नाईक व दिलीप पोले तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही जखमींना अंबुलन्स चालक आप्पा कदम यांनी तात्काळ उपचारासाठी कळमनुरी येथील शासकीय रुग्णालयात आणले. ते संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता चोरांचे बिंग फुटले. हिसकावलेले सोन्याचे गंठन जसेच्या तसे एका चोराच्या खिशात आढळून आले.

पोलिसांनी या दोन्ही गुन्हेगारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. चौकशीत या चोरांची ओळख हिंगोली जिल्ह्यातील बेलवाडी गावचे रहिवासी विकास गौतम वाढे आणि रामा मोहन पठाडे अशी झाली आहे. रस्ता अपघातात दोन्ही आरोपींना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या कडक देखरेखीखाली असून कळमनुरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कळमनुरी शहरात भररस्त्यावर महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून नेण्याची घटना घडल्याने महिला वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित सामग्री

ओव्हरटेकच्या नादात टिप्परची कारला धडक; मोठी दुर्घटना टळली

ओव्हरटेकच्या नादात टिप्परची कारला धडक; मोठी दुर्घटना टळली

Risod-Lonar Road Car accident: रिसोड–लोणार मार्गावर दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव टिप्परने कारला धडक दिल्याची घटना मांगवाडी फाट्याजवळ

Sep 24, 2026
सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; कार कंटेनरखाली अडकली, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; कार कंटेनरखाली अडकली, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंबजवळ कार-कंटेनर अपघातात कर्ण पवार यांचा मृत्यू; अनिकेत धोत्रे आणि रोहित मोरे गंभीर जखमी.

Sep 22, 2026
प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील गाडीचा ईस्टर्न फ्री वेवर अपघात; ३ वाहनांना धडक

प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील गाडीचा ईस्टर्न फ्री वेवर अपघात; ३ वाहनांना धडक

ईस्टर्न फ्री वेवर प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; टॅक्सी आणि दोन कारला धडक. आमदार दरेकर सुरक्षित, पोलिसांचा तपास सुरू.

Sep 21, 2026
मुंबईत आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक; विलेपार्ल्यात अपघात

मुंबईत आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक; विलेपार्ल्यात अपघात

विलेपार्ल्यात आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक. सुनील धुलविया जखमी असून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Sep 18, 2026
यवतमाळमध्ये कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; घाटंजी तालुक्यात हळहळ

यवतमाळमध्ये कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; घाटंजी तालुक्यात हळहळ

घाटंजीतील चिखलवर्धा येथे कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय अंशचा उपचारादरम्यान मृत्यू. ऑक्सिजन व रुग्णवाहिका उपलब्धतेबाबत नातेवाइकांचे गंभीर आरोप.

Sep 18, 2026