शिक्षण विभाग

उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख रिक्त जागा पदोन्नतीने भरल्याने शैक्षणिक कामकाज सुरळीत 

Department of Education: केंद्रीय शिक्षण विभागाने कळमनुरी तालुक्यातील रिक्त पदोंपैकी उच्च श्रेणी मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख पदांचे भरले आहेत. या पदोन्नतीने शाळांतील कामकाज सुटणार,

उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख रिक्त जागा पदोन्नतीने भरल्याने शैक्षणिक कामकाज सुरळीत 

Department of Education

 

आता प्रतिक्षा शिक्षणविस्तार अधिकारी, राजपत्रित मुख्याध्यापक पदे भरण्याची

आखाडा बाळापूर (Department of Education) : जिल्हा परिषद सिईओ विवेक गायकवाड मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने पात्र शिक्षकांना पदोन्नती दिली या पदोन्नतीने जिल्ह्यातील केंद्र प्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक बहुतांश पदे भरली आहेत.कळमनुरी तालुक्यातील उच्च श्रेणी मुख्याध्यापक सर्व रिक्त पदे भरण्यात आली तर केंद्र प्रमुख दोन पदे वगळता सगळे पदे भरण्यात आली यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात शैक्षणिक कामकाज सुरळीत होऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी हे उपयुक्त ठरणार आहे.

 कळमनुरी तालुक्यात १५० गावात कांडली, शेवाळा, पोत्रा, डोंगरगाव पूल, नांदापूर, खरवड, कोंढूर, मसोड, ढोलक्याचीवाडी, भाटेगाव, वारंगा फाटा, जवळा पांचाळ, बाभळी, कळमनुरी,मोरवड इत्यादी १५ केंद्रात आखाडा बाळापूर, शेवाळा, कळमनुरी, डोंगरकडा, कुर्तडी, येहळेगाव तुकाराम, मसोड, वाकोडी या ८ माध्यमिक व प्राथमिक -उच्च प्राथमिक अशा २०० वर जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात जिल्हा परिषद शाळा ग्रामीण भागात विद्यार्थी पालकांची पहिली पसंती आहे यात अनेक ठिकाणी केंद्र प्रमुख पदं अनेक वर्षांपासून रिक्त होते तर शाळा पैकी २९ शाळा मुख्याध्यापक पद रिक्त होते या पाठोपाठ शिक्षण विस्तार अधिकारी पदें रिक्त, माध्यमिक- प्राथमिक शिक्षक पद रिक्त,या प्रमुख रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील शाळा कामकाज प्रभावित होऊन शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत होता. 

जिल्हा परिषद सिईओ विवेक गायकवाड यांनी शिक्षक पदोन्नती रखडलेल्या प्रश्न काही दिवसांपूर्वी मार्गी लावला.यात शिक्षण विभागाने पात्र शिक्षकांना केंद्र प्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती दिली या पदोन्नतीने अनेक केंद्र व शाळा मधील रिक्त पदे भरून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी पावले उचलली गेली आहे.
केंद्र प्रमुख : कळमनुरी तालुक्यातील १५ केंद्र प्रमुख पदापैकी तब्बल ८ पद अनेक वर्षांपासून रिक्त होती या पदोन्नतीने शेवाळा केंद्र प्रमुख म्हणून मिथुन राऊत तर विकास नगर कळमनुरी केंद्र प्रमुख म्हणून नंदकुमार चोपडे, बाभळी केंद्र प्रमुख म्हणून अमोल पडोळे तर भाटेगाव केंद्र प्रमुख म्हणून श्रीकांत कास्टे,व कांडली केंद्र प्रमुख म्हणून अंकुलगे तर जवळा पांचाळ केंद्र प्रमुख म्हणून भुजबळ यांच्या नियुक्ती करून रिक्त पदे भरण्यात आली आता फक्त मोरवड व कोंढुर दोन केंद्र प्रमुख पद रिक्त आहे.

२४ उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदे भरली : या पदोन्नतीने शेवाळा उर्दू शाळा मुख्याध्यापक म्हणून अब्दुल खुद्दुस तर आखाडा बाळापूर कन्या शाळा मुख्याध्यापक म्हणून सुनीता गिरे तर जांब शाळेत संजय पवार व सुकळी वीर शाळेत एस.ए.पिरतवाड तसेच दांडेगाव शाळेत नेहा थोरात तर महालींगी शाळेत सुप्रिया दापके यांची विकास नगर कळमनुरी शाळेत गायकवाड तर उर्ध्व पेन गंगानगर व्हडगीर यांची तर मसोड शाळेत शिवकांता देवकते यांची उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून तर सेलसुरा शाळेत श्रद्धा चोंढेकर यांची तसेच मोरवड शाळेत रविंद्र खंदारे व सालेगाव शाळेत बिराजदार यांना तर वारंगा तना शाळेत सुधाकर ढोंगे तर सांडस शाळेत गोपाळ कदम व कुंभारवाडी शाळेत रूबीना बेगम यांची तर सिंदगी शाळेत तोटावार व पोत्रा शाळेत कानवटे तर बाभळी शाळेत मोरे व बेलमंडळ शाळा कुहे व नवीन चिखली शाळा जैस्वाल तर वारंगाफाटा शाळा लक्ष्मण पवार व वारंगा वसाहत चव्हाण तर डीग्रस बु शाळा विनायक चव्हाण तर वडगाव शाळा इंगोले असे रिक्त २४ ठिकाणी उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदे भरली आहे अशी माहिती गटशिक्षणाधिकारी सुरेश सोनुने यांनी दैनिक दैशोन्नती तालुका प्रतिनिधींशी बोलताना सोमवारी दिली. 

 कळमनुरी तालुक्यातील केंद्र प्रमुख व उच्च श्रेणी मुख्याध्यापक रिक्त पदे नुकत्याच झालेल्या पदोन्नतीने भरण्यात आली आहे.तालुक्यातील नावाजलेल्या जुन्या शाळा पैकी आखाडा बाळापूर व शेवाळा जिल्हा परिषद शाळा राजपत्रित मुख्याध्यापक पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहे या शाळा बरोबर कळमनुरी, डोंगरकडा,कुर्तडी जिल्हा परिषद शाळा राजपत्रित मुख्याध्यापक पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहे यामुळे शाळेतील जेष्ठ माध्यमिक शिक्षकाला अतिरिक्त मुख्याध्यापक पदभार सांभाळत ज्ञानार्जन करावं लागतं आहे.

 कळमनुरी तालुक्यातील बिट नांदापूर, बिट शेवाळा,बिट डोंगरकडा ४ पैकी ३ बिट शिक्षण विस्तार अधिकारी पदे रिक्त आहेत बिट कळमनुरी शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सतिश काष्टे आले परंतु त्यांच्याकडे वसमत गटशिक्षणाधिकारी अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे असं सुत्रांनी सांगितले.

 गटशिक्षणाधिकारी सुरेश सोनुने हे उपलब्ध केंद्र प्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांच्या सहकार्याने तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करत आहेत.तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी बरोबर राजपत्रित मुख्याध्यापक रिक्त पदे भरून, माध्यमिक शिक्षक, विषय शिक्षक, मराठी- उर्दू माध्यम भरुन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय दूर करण्यासाठी आता पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026