घोट (Farmers Online Fraud) : घोट येथील रोजगार सेवक किशोर ढिवरुजी बुरांडे यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र, घोट शाखेतील खात्यातून सायबर भामट्यांनी ऑनलाइन व्यवहाराद्वारे 99 हजार 998 रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना 17 जुलै रोजी रात्री 8.41 वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, किशोर बुरांडे यांच्या खात्यात नुकतीच पीक कर्जाची रक्कम जमा झाली होती. त्यानंतर अज्ञात सायबर भामट्यांनी ऑनलाइन व्यवहार करून प्रथम 49 हजार 999 रुपये व त्यानंतर 48 हजार 999 रुपये,अशा दोन व्यवहारांत एकूण 99 हजार 998 रुपये परस्पर काढून घेतले.
खात्यातील रक्कम कमी झाल्याचे निदर्शनास येताच किशोर बुरांडे यांनी तातडीने राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल केली.तसेच संबंधित बँक आणि यंत्रणेलाही घटनेची माहिती देण्यात आली. या (Farmers Online Fraud) घटनेमुळे घोट परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.पीक कर्जाची रक्कमही सायबर भामट्यांच्या निशाण्यावर असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे बँक खात्याशी संबंधित OTP, PIN, पासवर्ड,किंवा इतर गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये, तसेच संशयास्पद व्यवहार आढळताच नागरिकांनी तातडीने बँकेशी आणि सायबर गुन्हे शाखेशी संपर्क करावा.
शेतकरी सायबर भामट्यांचा बळी; पीक कर्जाची रक्कम ऑनलाइन फसवणुकीत लंपास
Farmers Online Fraud: घोट शाखेतील किशोर ढिवरुजी बुरांडे यांचा बँक खाता सायबर भामट्याने ऑनलाइन व्हॅल्यू ट्रान्जेक्शन करून ९९,९९८ रुपये उचलले.
Farmers Online Fraud
संबंधित सामग्री
गरबा खेळण्यासाठी पार्टनर ‘भाड्याने’? जाहिराती व्हायरल; सायबर फसवणुकीचा धोका, संजय उपाध्यायांची पोलिसांकडे धाव
नवरात्रीपूर्वी ‘Rent a Garba Partner’च्या जाहिराती व्हायरल; सायबर फसवणुकीच्या शक्यतेने संजय उपाध्यायांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली.
SIM कार्ड देताना सावधान! बनावट SIM आणि IMEI फेरफार केल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास
तुमच्या नावावरचं SIM दुसऱ्याला दिल्यास कारवाई होऊ शकते. बनावट SIM आणि IMEI फेरफारप्रकरणी ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास व ५० लाखांपर्यंत दंड.
उल्हासनगरमध्ये सहाय्यक सरकारी अभियोक्त्यावर लाचखोरीचा आरोप; ACB कडून सुषमा पाटील यांना अटक
उल्हासनगरच्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता सुषमा पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या जबाबदाऱ्या कडक; दुर्लक्ष केल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई
गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने पोलीस पाटलांना त्यांच्या कर्तव्यांची नव्याने आठवण करून दिली आहे.
SIRच्या नावाने पुण्यात सायबर फसवणूक; ज्येष्ठ नागरिकाला ४ लाख ४३ हजारांचा गंडा
मतदार यादी दुरुस्तीच्या प्रक्रियेचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.