Rent a Garba Partner

गरबा खेळण्यासाठी पार्टनर ‘भाड्याने’? जाहिराती व्हायरल; सायबर फसवणुकीचा धोका, संजय उपाध्यायांची पोलिसांकडे धाव

नवरात्रीपूर्वी ‘Rent a Garba Partner’च्या जाहिराती व्हायरल; सायबर फसवणुकीच्या शक्यतेने संजय उपाध्यायांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली.

गरबा खेळण्यासाठी पार्टनर ‘भाड्याने’? जाहिराती व्हायरल; सायबर फसवणुकीचा धोका, संजय उपाध्यायांची पोलिसांकडे धाव

नवरात्रीपूर्वी सोशल मीडियावर १ ते ५ हजार रुपयांत गरबा पार्टनर देण्याचे दावे; जाहिरातींची सत्यता तपासण्याची मागणी

नवरात्रोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वीच सोशल मीडियावर ‘Rent a Garba Partner’च्या जाहिरातींची चर्चा सुरू झाली आहे. पैसे घेऊन अनोळखी व्यक्तींना गरबा पार्टनर उपलब्ध करून देण्याचे दावे या जाहिरातींमधून केले जात आहेत. मात्र अशा ऑफर्सच्या माध्यमातून सायबर फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार किंवा अन्य बेकायदेशीर प्रकार घडण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार संजय उपाध्याय यांनी पोलीस प्रशासनाकडे पत्राद्वारे या जाहिरातींची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नवरात्रीच्या काळात देशभरात मोठ्या प्रमाणावर गरबा आणि ‘गरबा नाईट’चे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडिया आणि डेटिंग ॲप्सवर महिला-पुरुष तसेच तरुण-तरुणींना पैसे घेऊन गरबा पार्टनर उपलब्ध करून देण्याच्या जाहिराती प्रसारित होत असल्याचे समोर आले आहे. काही जाहिरातींमध्ये मुलींना १ ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान पार्टनर म्हणून उपलब्ध करून देण्याचे दावे करण्यात आल्याची माहिती आहे.

या जाहिरातींमध्ये विविध पॅकेज आणि त्यासाठीचे शुल्क नमूद केले जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अशा पोस्टच्या माध्यमातून नागरिकांना आकर्षित करून त्यांच्याकडून ऑनलाइन पैसे उकळणे, फिशिंग लिंकवर क्लिक करण्यास प्रवृत्त करणे किंवा वैयक्तिक माहिती मिळवणे यासारखे प्रकार होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. गुजरातमध्येही अशाच ‘Rent A Garba Partner’ पोस्टबाबत अहमदाबाद सायबर क्राइम सेलने नागरिकांना अनोळखी प्रोफाइलवर विश्वास ठेवून पैसे पाठवू नयेत, असा इशारा दिला आहे.

दरम्यान, भाजप नेते आणि आमदार संजय उपाध्याय यांनी या प्रकाराची दखल घेत पोलीस प्रशासनाला पत्र पाठवले आहे. ‘Rent a Garba Partner’च्या जाहिराती नेमक्या कोणाकडून केल्या जात आहेत, त्यामागील आयोजक कोण आहेत आणि संबंधित व्यक्तींची माहिती काय आहे, याची पडताळणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सोशल मीडिया तसेच डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून अशा प्रकारांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

नवरात्री आणि गरबा उत्सवाला बदनाम करणाऱ्या किंवा नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या प्रकारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे उपाध्याय यांनी म्हटले आहे. विशेषतः महिला, मुली आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच तरुण-तरुणींनी अशा जाहिराती आणि संशयास्पद ऑफर्सपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
कोट्यवधींचा दांडिया खर्च शेतकऱ्यांसाठी द्या; मराठी एकीकरण समितीची मागणी

कोट्यवधींचा दांडिया खर्च शेतकऱ्यांसाठी द्या; मराठी एकीकरण समितीची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गरबा-दांडियाच्या कोट्यवधींच्या खर्चावरून वाद. मराठी एकीकरण समितीने निधी शेतकऱ्यांसाठी वापरण्याची मागणी केली.

Sep 30, 2026
विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील ASI रवींद्र कोकांडे यांना छातीत तीव्र वेदना झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 28, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण केल्याप्रकरणी 11 पोलिसांवर FIR. मानवाधिकार आयोगानंतर तपास CIDकडे.

Sep 24, 2026