नोएडामध्ये पगारवाढीच्या मागणीसाठी आंदोलन हिंसक; वाहने जाळली, पोलिस वाहन उलटवले

नोएडातील फेज-2 परिसरात मद्रासनसह सहा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला आज सकाळी अचानक हिंसक वळण लागले.

नोएडामध्ये पगारवाढीच्या मागणीसाठी आंदोलन हिंसक; वाहने जाळली, पोलिस वाहन उलटवले

Wage Hike Demand

नोएडा (Wage Hike Demand) : नोएडातील फेज-2 परिसरात मद्रासनसह सहा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला आज सकाळी अचानक हिंसक वळण लागले. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात कर्मचारी त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

आंदोलनाचा तणाव अचानक वाढला

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येने कर्मचारी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी घोषणाबाजी करत परिस्थिती चिघळवली. संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक सुरू केली तसेच काही वाहनांची तोडफोड करत बस आणि कारना आग लावल्याची घटना घडली.

पोलिसांवरही दगडफेक, अश्रुधुराचा वापर

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केली. त्यामुळे परिस्थिती अधिक बिघडली आणि पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला.

पोलिस वाहनाची तोडफोड व उलटफेर

हिंसाचाराच्या दरम्यान आंदोलकांनी उभ्या असलेल्या पोलिस वाहनाची तोडफोड करून ते उलटवले. वाहनातील साहित्यही बाहेर फेकण्यात आले. या प्रकारामुळे औद्योगिक परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

कंपनी परिसरात जाळपोळ

मद्रासन कंपनीबाहेर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एका वाहनाला आग लावण्यात आली. याशिवाय सेक्टर 15 आणि सेक्टर 62 परिसरातही कामगारांनी गोंधळ घातल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी 200 हून अधिक कर्मचारी उपस्थित असल्याचे सांगण्यात येते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

पोलीस आयुक्त लक्ष्मी सिंह यांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्रात पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांकडून आंदोलकांशी संवाद साधून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकतेनुसार कमी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली जात आहे, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. कामगारांच्या मागण्यांबाबत कालच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि औद्योगिक प्रतिनिधी तसेच कामगार विभागाचे प्रधान सचिव यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यावेळी आश्वासन देण्यात आले असतानाही आज आंदोलन पुन्हा उफाळून आले आणि त्याला हिंसक स्वरूप प्राप्त झाले. पगारवाढीच्या मागणीवरून सुरू झालेले हे आंदोलन अचानक हिंसाचारात रूपांतरित झाल्याने नोएडा औद्योगिक परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.

संबंधित सामग्री

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

Hingoli Rural Police Action: शहरातील अकोला बायपास परिसरातील दुकानासमोर उभा केलेला सुमारे आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस

Oct 02, 2026
परभणीत मोटार वायर चोरणारे सहा चोरटे ताब्यात

परभणीत मोटार वायर चोरणारे सहा चोरटे ताब्यात

Daithana Police Action: डफवाडी शिवारातील शेतातून मोटारचे वायर चोरी गेल्याच्या प्रकरणात दैठणा पोलिसांनी तपास करत चोरट्यांना ताब्यात घेतले. वायर वितळवून मिळविलेले दोन किलो तांबे..

Sep 29, 2026
नागपूरनंतर बेडगावची धडक कारवाई; आता कोंबडा बाजारांकडेही पोलिसांचे लक्ष कधी?

नागपूरनंतर बेडगावची धडक कारवाई; आता कोंबडा बाजारांकडेही पोलिसांचे लक्ष कधी?

Bedgaon Police Action: गडचिरोली जिल्ह्यात अवैध व्यवसाय व जुगारावर अंकुश आणण्यासाठी पोलिसांकडून कारवाईची मोहीम सुरू असताना कोरची तालुक्यातील कोंबडा बाजारांकडेही आता लक्ष देण्याची मागणी

Sep 21, 2026
चिखली येथील आयटीआयच्या गेटवर चार दिवस गाडी; अखेर पोलिसांनी नेली ठाण्यात!

चिखली येथील आयटीआयच्या गेटवर चार दिवस गाडी; अखेर पोलिसांनी नेली ठाण्यात!

चिखलीत आयटीआय व जिल्हा परिषद शाळेचा रस्ता चार दिवस बंद; मनसेच्या मागणीनंतर पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली. जागेच्या मालकीवरूनही वाद निर्माण झाला आहे.

Sep 21, 2026