सागर विषारी दारू प्रकरण

विषारी दारूने घेतले 11 बळी; सागर प्रकरणात 4 अधिकाऱ्यांवर कारवाई

Sagar toxic liquor case: बंडा तहसील परिसरात विषारी दारू प्यायल्याने तब्बल 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कठोर भूमिका घेतली

विषारी दारूने घेतले 11 बळी;  सागर प्रकरणात 4 अधिकाऱ्यांवर कारवाई

madhya Pradesh News

सागर (madhya Pradesh News) : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात विषारी दारूमुळे मोठी दुर्घटना घडली आहे. बंडा तहसील परिसरात विषारी दारू प्यायल्याने तब्बल 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कठोर भूमिका घेतली असून, प्रथमदर्शनी जबाबदार मानत 3 उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर एका वरिष्ठ अधिकाऱ्याला जिल्ह्यातून हटवून मुख्यालयात संलग्न करण्यात आले आहे.

शनिवारी रात्री बंडा परिसरातील घूघर, नौराज, बराज आणि आसपासच्या गावांमध्ये काही नागरिकांनी दारूचे सेवन केले.  madhya Pradesh News त्यानंतर अनेकांची प्रकृती अचानक बिघडली. उलट्या, डोकेदुखी, ताप तसेच श्वास घेण्यास त्रास यांसारखी लक्षणे दिसू लागल्यानंतर नातेवाईकांनी संबंधितांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, काहींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

घटनेची (Sagar toxic liquor case) माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. madhya Pradesh News  मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

तीन अधिकारी निलंबित

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सागरच्या सहाय्यक उत्पादन शुल्क आयुक्त कीर्ती दुबे, सहाय्यक जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी दिलीप खंडाते आणि बंडा विभागाच्या उत्पादन  madhya Pradesh News शुल्क उपनिरीक्षक प्रोशनी उरेती यांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय उपायुक्त तथा विभागीय फ्लाइंग स्क्वॉड प्रभारी नीरजा श्रीवास्तव यांना जिल्ह्यातून हटवून ग्वाल्हेर मुख्यालयात संलग्न करण्यात आले आहे. madhya Pradesh News  त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत एकूण चार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे.

प्रशासनाकडून प्रभावित भागात तपासणी

 madhya Pradesh News सागर विभागाचे आयुक्त, आयजी, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रभावित गावांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पीडित कुटुंबांची भेट घेऊन माहिती जाणून घेण्यात आली. तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या उपचार व्यवस्थेचीही पाहणी करण्यात आली. प्रशासनाकडून प्रभावित भागात नागरिकांची स्क्रीनिंग मोहीम सुरू करण्यात आली आहे. दारूचे सेवन केल्यानंतर प्रकृती बिघडलेल्या व्यक्तींची तातडीने ओळख करून त्यांना उपचार मिळावेत, madhya Pradesh News  यासाठी आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे.

मृतांचा आकडा 10 की 11?

सागरच्या जिल्हाधिकारी प्रतिभा पाल यांच्या माहितीनुसार,  madhya Pradesh News बंडा तहसीलमधील प्रभावित गावांमध्ये अवैध विषारी दारूमुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, स्थानिक भाजप आमदार वीरेंद्र लोधी यांनी मृतांचा आकडा 11 असल्याचे सांगितले आहे.

बंडा सिव्हिल हॉस्पिटलमधून सुमारे 25 रुग्णांना पुढील उपचारांसाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. (Sagar toxic liquor case) ताप आणि डोकेदुखीची तक्रार असलेल्या काही नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी तीन जणांना बुंदेलखंड मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत आहे.

ललितपूरमधून विषारी दारूचा पुरवठा झाल्याचा संशय

प्राथमिक तपासात संशयित दारूचा पुरवठा उत्तर प्रदेशातील ललितपूर येथून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ललितपूरमधून विषारी दारूचा पुरवठा करणाऱ्या एका टोळीबाबत माहिती मिळाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सागरचा हा भाग उत्तर प्रदेशच्या सीमेजवळ असल्याने पोलिसांकडून या दिशेनेही तपास केला जात आहे madhya Pradesh News. मात्र, दारूची संपूर्ण सप्लाय चेन आणि या प्रकरणातील आरोपींची भूमिका अद्याप तपासाच्या कक्षेत आहे.

सात दारू दुकाने सील

घटनेनंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून प्रभावित भागातील दारूची दुकाने सील केली आहेत. दारूचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. madhya Pradesh News अवैध दारूच्या व्यवसायात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत.

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

 madhya Pradesh News ज्यांनी अलीकडच्या काळात दारूचे सेवन केले आहे आणि त्यांना उलटी, डोकेदुखी, ताप, श्वास घेण्यास त्रास किंवा इतर कोणतीही अस्वस्थता जाणवत असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मृतदेह ठेवून चक्काजाम

या (Sagar toxic liquor case) घटनेनंतर संतप्त नागरिकांनी नुकसानभरपाईसह विविध मागण्यांसाठी बंडा चौकात मृतदेह रस्त्यावर ठेवून चक्काजाम केला.  madhya Pradesh News मृताच्या नातेवाईकांनी सांगितले की, संबंधित व्यक्तीने रविवारी संध्याकाळी दारू प्यायली होती. त्यानंतर त्याला उलट्या होऊ लागल्या, शरीर अकडले आणि श्वासोच्छवासाचा वेग वाढला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंडा परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काँग्रेसकडून न्यायालयीन चौकशीची मागणी

या (Sagar toxic liquor case) घटनेवरून मध्य प्रदेश काँग्रेसने राज्य सरकारवर टीका केली आहे.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. राज्यात अवैध दारूचे नेटवर्क सक्रिय असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, बंडाचे माजी काँग्रेस आमदार तरवर लोधी यांनीही बंडा विकासखंडातील अनेक गावांमध्ये शनिवारी रात्री नागरिकांनी दारू प्यायल्याचे सांगितले. त्यानंतर अनेकांची प्रकृती अचानक बिघडल्याचा दावा त्यांनी केला.

तपासानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार

 सागरमधील या (Sagar toxic liquor case) घटनेमुळे मध्य प्रदेशातील अवैध दारूच्या नेटवर्कचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या पोलिसांकडून दारूचे नमुने, शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. मृत्यू नेमका विषारी दारूमुळेच झाला का आणि या प्रकरणामागे कोणाचा हात आहे, हे तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

संबंधित सामग्री

बासंबा येथे अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; एक लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त

बासंबा येथे अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; एक लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त

बासंबा शिवारात अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कारवाई करत ३९ हजार ४० रुपयांची दारू आणि एक लाख रुपयांची कार असा एकूण १ लाख ३९ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Sep 13, 2026
विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी बाळू लोंढे अखेर अटकेत; CIDकडे तपास

विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी बाळू लोंढे अखेर अटकेत; CIDकडे तपास

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी गावठी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणात फरार असलेला मुख्य आरोपी बाळू लोंढे अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे.

Aug 27, 2026
३,४०० लिपस्टिकचे Kiss Marks असलेली कार रस्त्यावर धावताच पोलिसांची कारवाई; चालकाला ५,५०० रुपयांचा दंड

३,४०० लिपस्टिकचे Kiss Marks असलेली कार रस्त्यावर धावताच पोलिसांची कारवाई; चालकाला ५,५०० रुपयांचा दंड

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला अनोखा प्रयोग मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका कारचालकाला चांगलाच महागात पडला.

Aug 25, 2026
परभणीत बोलेरोतून देशी दारूची वाहतूक; पालम पोलिसांची कारवाई

परभणीत बोलेरोतून देशी दारूची वाहतूक; पालम पोलिसांची कारवाई

परभणीतील पालम तालुक्यातील पेठपिंपळगाव ते पालम रोडवरील जगदंबा हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर कारवाई करत पोलिसांनी बोलेरो वाहनातून नेण्यात येत असलेली अवैध देशी दारू जप्त केली आहे.

Aug 22, 2026
हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत; स्थानिक गुन्हे शाखा मात्र झोपेत

हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत; स्थानिक गुन्हे शाखा मात्र झोपेत

नांदेड परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी १ ते ३१ ऑगस्टदरम्यान अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, शस्त्र अधिनियमांतर्गत विशेष निर्मूलन मोहीम-२ उघडली आहे.

Aug 22, 2026