Local Crime Branch

हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत; स्थानिक गुन्हे शाखा मात्र झोपेत

नांदेड परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी १ ते ३१ ऑगस्टदरम्यान अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, शस्त्र अधिनियमांतर्गत विशेष निर्मूलन मोहीम-२ उघडली आहे.

हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत; स्थानिक गुन्हे शाखा मात्र झोपेत

Local Crime Branch

कारवाईमध्ये पोलीस ठाण्यांची व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाची घोडदौड

हिंगोली : नांदेड परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी १ ते ३१ ऑगस्टदरम्यान अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, शस्त्र अधिनियमांतर्गत विशेष निर्मूलन मोहीम-२ उघडली आहे. या मोहिमेच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजे १ ते २१ ऑगस्टदरम्यान संपूर्ण परिक्षेत्रात तब्बल १,२३३ गुन्हे दाखल झाले असून, १,९६२ इसमांविरुद्ध कारवाई करून ११ कोटी २४ लाख ८९ हजार ७२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होणे हेच स्पष्ट करते की जिल्ह्या-जिल्ह्यात अवैध धंदे आजही राजरोसपणे सुरू आहेत.

यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर चित्र अधिक गंभीर आहे. जिल्ह्यात या तीन आठवड्यांत एकूण २७९ गुन्हे दाखल झाले आहेत. यात गुटखा व्यावसायिकांविरुद्ध फक्त ४ गुन्हे दाखल करून ८ लाख ४ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ५ आरोपींवर कारवाई झाली, तर मटका-जुगाराचे ६० गुन्हे दाखल करून १३ लाख ९३ हजार २८५ रुपयांचा मुद्देमाल आणि १६५ आरोपींवर कारवाई करण्यात आली. अवैध दारूचे १६९ गुन्हे दाखल करून १० लाख ३३० रुपयांचा मुद्देमाल आणि १७० आरोपींवर कारवाई झाली. शस्त्र अधिनियमाचे ९ गुन्हे दाखल करून २८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल आणि ९ आरोपींवर कारवाई करण्यात आली. तर इतर अधिनियमाखाली ३७ गुन्ह्यांमध्ये ७२ लाख १७ हजार ४८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ४१ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ही सर्व कारवाई जवळपास पोलीस ठाणे स्तरावर जोमाने करण्यात आली आहे. जिल्ह्याची मुख्य तपास शाखा समजल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेकडून मात्र म्हणावी तशी ठोस आणि समाधानकारक कारवाई झालेली दिसून येत नाही. गुटखा तस्करी, मोठे मटका-जुगार अड्डे आणि अवैध शस्त्रसाठ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने धाडसत्र राबवणे अपेक्षित असताना, किरकोळ कारवाई करून कागदोपत्री आकडे रंगवण्याचे काम सुरू असल्याची चर्चा पोलीस दलातच आहे.

हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्यांची मुळे खोलवर रुजलेली असताना एलसीबीची ही सुस्त भूमिका नेमकी कोणाला पाठीशी घालण्यासाठी आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. दुसरीकडे नांदेड जिल्ह्यात ३५१, परभणीत २९९, तर लातूरमध्ये २९८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्या तुलनेत हिंगोलीत गुटखा आणि शस्त्र अधिनियमातील कारवाई अत्यंत कमी आहे. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोहीम उघडल्यानंतर पोलीस ठाण्यांनी रस्त्यावर उतरून कारवाई केली; पण जिल्ह्याचे डोळे आणि कान असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने मात्र अजूनही डोळेझाक केल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

अवैध धंद्याची माहिती द्यावी

दरम्यान, ही विशेष मोहीम पुढील आठवड्यात आणखी व्यापकपणे राबवण्यात येणार असून, नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती ९१ ५० १०० १०० या ‘खबर’ हेल्पलाईनवर फोन किंवा व्हॉट्सॲपद्वारे द्यावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे खबरे वळले

औंढा ना. पोलीस ठाणे हद्दीत यापूर्वी देशी दारूच्या १० बॉक्ससह कार जप्त केली होती. हा छापा पोलीस अधीक्षकांच्या माहितीवरूनच मारण्यात आला होता. त्या पाठोपाठ आता आयजी शहाजी उमाप यांच्या पथकाने अनखळी येथे छापा मारून १ लाख ४२ हजार ७८० रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला होता.

विशेष म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांची माहिती मिळत असताना स्थानिक गुन्हे शाखेवरील खबऱ्यांचा विश्वास उडाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे ते वळल्याचे चित्र दिसून येत आहे.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026