विषबाधेच्या प्रकरणाला नवं वळण! पिठावरील संशय कमी, तपास घराकडे वळला...

गुजरातमधील अहमदाबाद शहरातील चांदखेडा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

विषबाधेच्या प्रकरणाला नवं वळण! पिठावरील संशय कमी, तपास घराकडे वळला...

Prajapati Family

अहमदाबाद (Prajapati Family) : गुजरातमधील अहमदाबाद शहरातील चांदखेडा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. प्रजापती कुटुंबातील दोन लहान बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. सुरुवातीला डोशाच्या पिठामुळे विषबाधा झाल्याचा कुटुंबाचा दावा होता, मात्र पोलिस तपासात वेगळेच संकेत मिळत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांची राहा आणि चार वर्षांची मिश्री या दोन्ही चिमुरड्यांची उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुटुंबातील इतर सदस्य – विमल प्रजापती आणि त्यांची पत्नी भावना – यांनाही प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून भावनांची प्रकृती गंभीर आहे.

या घटनेनंतर चौघांचे रक्तनमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. प्राथमिक अहवालात सर्वांच्या नमुन्यांमध्ये झिंक आणि ॲल्युमिनियम फॉस्फाइडसारखी विषारी संयुगे आढळून आली आहेत. त्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याच्या सुरुवातीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, संबंधित कुटुंबाने ज्या डेअरीमधून डोशाचे पीठ खरेदी केले होते, त्या पिठामुळे विषबाधा झाली असती तर इतर ग्राहकांनाही त्रास झाला असता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र अशा कोणत्याही तक्रारी समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे तपासाची दिशा आता हेतूपुरस्सर विषप्रयोगाकडे वळत आहे.

दरम्यान, स्तनपानामुळे लहान बाळावर विषाचा परिणाम झाला का, तसेच कीटकनाशकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ॲल्युमिनियम फॉस्फाइडचा यात काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे. यासोबतच विमल प्रजापती डेअरीतून निघाल्यानंतर थेट घरी गेले की अन्यत्र थांबले, याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

पोलिसांनी डेअरीमधून डोशाचे पीठ आणि इतर नमुने जप्त केले असून, आता अंतर्गत अवयवांच्या व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा आहे. हा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि पुढील कायदेशीर कारवाईचा मार्ग ठरेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

संबंधित सामग्री

वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचा मृत्यू; आत्महत्या की आणखी काही?

वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचा मृत्यू; आत्महत्या की आणखी काही?

वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचा संशयास्पद मृत्यू झाला. चौथ्या मजल्यावरून पडलेल्या दीपक कुमार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पोलिस तपास सुरू आहे.

Sep 26, 2026
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ५०५३ पानांचे दोषारोपपत्र; लोहगडावर रचलेला कट पोलिस तपासात उघड

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ५०५३ पानांचे दोषारोपपत्र; लोहगडावर रचलेला कट पोलिस तपासात उघड

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ५०५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल. लोहगडाची रेकी, बनावट Instagram अकाऊंट आणि अन्य बाबी तपासात समोर

Sep 20, 2026
रात्री भेटायला गेली... परतलीच नाही; दोन दिवसांनी शेतात आढळला मृतदेह; दिल्लीतील क्रूर हत्याकांड

रात्री भेटायला गेली... परतलीच नाही; दोन दिवसांनी शेतात आढळला मृतदेह; दिल्लीतील क्रूर हत्याकांड

दिल्लीतील स्वरूप नगरमध्ये १६ वर्षीय मुलीची हत्या. ५० हून अधिक CCTV तपासल्यानंतर १९ वर्षीय तरुणाला अटक, तीन अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात.

Sep 18, 2026
देगलूरच्या अंध विद्यालयातील विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा; उदगीरमध्ये ‘व्ही. एस. पँथर्स’चा कॅन्डल मार्च

देगलूरच्या अंध विद्यालयातील विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा; उदगीरमध्ये ‘व्ही. एस. पँथर्स’चा कॅन्डल मार्च

देगलूर येथील अंध विद्यालयात शिक्षण घेत असताना उदगीर येथील मूळ रहिवासी असलेल्या अंध विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात चिंता व्यक्त होत आहे.

Aug 26, 2026
MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षा रद्द; पेपरफुटीच्या तक्रारीनंतर आयोगाचा मोठा निर्णय

MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षा रद्द; पेपरफुटीच्या तक्रारीनंतर आयोगाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अन्न व औषध प्रशासनातील ‘औषध निरीक्षक’ (गट-ब) पदासाठी राबविण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Aug 26, 2026