Candle March

देगलूरच्या अंध विद्यालयातील विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा; उदगीरमध्ये ‘व्ही. एस. पँथर्स’चा कॅन्डल मार्च

देगलूर येथील अंध विद्यालयात शिक्षण घेत असताना उदगीर येथील मूळ रहिवासी असलेल्या अंध विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात चिंता व्यक्त होत आहे.

देगलूरच्या अंध विद्यालयातील विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा; उदगीरमध्ये ‘व्ही. एस. पँथर्स’चा कॅन्डल मार्च

दोषींवर कठोर कारवाईची मागणी; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शांततेत मोर्चा

उदगीर : देगलूर येथील अंध विद्यालयात शिक्षण घेत असताना उदगीर येथील मूळ रहिवासी असलेल्या अंध विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी मंगळवारी सायंकाळी उदगीरमध्ये ‘व्ही. एस. पँथर्स’ युवा संघटनेच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोदभाऊ खटके यांच्या सूचनेनुसार आणि उदगीर तालुकाध्यक्ष प्रतीक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला. भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर सायंकाळी सात वाजता शांततेत कॅन्डल मार्च काढण्यात आला. यामध्ये महिला, युवती, युवक तसेच समस्त उदगीरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या कॅन्डल मार्चचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला. यावेळी व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रतीक कांबळे यांनी विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करून या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

या कॅन्डल मार्चच्या आयोजनासाठी व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रतीक कांबळे, शहराध्यक्ष करण कांबळे, तालुका कार्याध्यक्ष बळीराम गायकवाड, शहर कार्याध्यक्ष सागर मोरे, तालुका उपाध्यक्ष जावेद सय्यद, संदीप गायकवाड, अक्षय गायकवाड, लक्ष्मण कांबळे, प्रीतम कांबळे, सुनील कांबळे, महेबुब शेख, किरण सूर्यवंशी, धनराज वाघमारे, शिल्पा कांबळे, पंचशीला कांबळे, शालुबाई हंडीशेरे, प्रतिभा कांबळे, ज्योती कांबळे आणि कविता कांबळे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

Nanded Aadhar card: गत पंधरा वर्षांपासून आधार कार्ड नसल्याने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासह दैनंदिन प्रशासकीय कामकाजात अडचणींचा सामना करणाऱ्या संजय डोमाजी दालपे यांना नितीन हातमोडे, सेतू केंद्र..

Oct 07, 2026