NEET Paper Leak

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा; शिवराज मोटेगावकरने केमिस्ट्री प्रश्नांसाठी दिले ५ लाख, CBIचा दावा

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा; शिवराज मोटेगावकरने केमिस्ट्री प्रश्नांसाठी दिले ५ लाख, CBIचा दावा

फॉरेन्सिक तपासात मोबाईलमधून १३२ प्रश्नांचे फोटो; त्यातील १११ प्रश्न NTAच्या मास्टर प्रश्नसंचाशी जुळल्याचे निष्पन्न

नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी संबंधित शिवराज मोटेगावकर यांनी रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न मिळवण्यासाठी तब्बल ५ लाख रुपये दिल्याचा आरोप तपासातून समोर आला आहे. या घडामोडीमुळे पेपरफुटी प्रकरणातील तपासाला नवे वळण मिळाले आहे.

महिनाभरापूर्वी उघडकीस आलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणामुळे राज्यासह देशभरात मोठी राजकीय चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केले असून, सलग १८ दिवस उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे.

CBIच्या तपासानुसार, शिवराज मोटेगावकर यांचा मुलगा पी. व्ही. कुलकर्णी यांच्या 'केमिस्ट्री ट्युटोरियल्स' या कोचिंग क्लासमध्ये शिकत होता. तपासात याच ठिकाणी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न उपलब्ध करून देण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रश्नांच्या बदल्यात मोटेगावकर यांनी ५ लाख रुपये दिल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे.

तपासादरम्यान CBIने मोटेगावकर यांचा मोबाईल जप्त करून त्याची फॉरेन्सिक तपासणी केली. या तपासात मोबाईलमध्ये एकूण ३६ छायाचित्रे आढळली, त्यापैकी ५ छायाचित्रे डुप्लिकेट असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित छायाचित्रांमध्ये हाताने लिहिलेले रसायनशास्त्र विषयाचे १३२ प्रश्न आढळले.

या प्रश्नांची NTAच्या मास्टर प्रश्नसंचाशी तुलना करण्यात आली असता, त्यापैकी १११ प्रश्न तंतोतंत जुळत असल्याचे CBIच्या तपासातून स्पष्ट झाले. तसेच मोबाईलच्या मेटाडेटाच्या विश्लेषणातून हे फोटो ३ मे रोजी काढण्यात आल्याचे समोर आले. म्हणजेच NEET परीक्षा होण्याच्या सुमारे दहा दिवस आधीच संबंधित प्रश्न आरोपींपर्यंत पोहोचल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

CBIच्या म्हणण्यानुसार, हे प्रश्न स्वतः शिवराज मोटेगावकर यांनी हाताने लिहून घेतले होते. या व्यापक पेपरफुटी रॅकेटच्या तपासात CBIने आतापर्यंत पुणे, लातूर आणि इतर भागांतून १३ जणांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये २० वर्षीय अमन सोनीचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून चार मित्र ताब्यात घेण्यात आले आह

Oct 05, 2026