Jamnagar Crime

ऑस्ट्रेलियात नोकरीला गेल्याची बनावट कहाणी; दोन वर्षांनंतर कारखान्याच्या काँक्रीटखालून मिळाला नवऱ्याचा सांगाडा

गुजरातमधील जामनगर येथे दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला आहे.

ऑस्ट्रेलियात नोकरीला गेल्याची बनावट कहाणी; दोन वर्षांनंतर कारखान्याच्या काँक्रीटखालून मिळाला नवऱ्याचा सांगाडा

पत्नी, प्रियकर आणि सहकाऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा; दारूत सायनाइड मिसळून हत्या केल्याची कबुली, फॉरेन्सिक तपास सुरू

जामनगर : गुजरातमधील जामनगर येथे दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला आहे. नातेवाईकांना तो ऑस्ट्रेलियात नोकरीसाठी गेल्याचे सांगितले जात असताना, पोलिस तपासात कारखान्याच्या काँक्रीटखाली पुरलेला त्याचा सांगाडा आढळून आला. या प्रकरणात पत्नी, तिचा कथित प्रियकर आणि आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार तिघांनी मिळून हत्या केल्याचा संशय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताची ओळख जिग्नेश अशी असून, त्याची पत्नी पृथ्वी उर्फ भूमीबेन हिने नातेवाईकांना जिग्नेश कामानिमित्त ऑस्ट्रेलियात गेल्याचे सांगितले होते. त्याच्याशी संपर्क साधण्याबाबत विचारणा झाल्यास, तो ज्या कंपनीत काम करतो तेथे मोबाईल वापरण्यास परवानगी नसल्याचे कारण ती सातत्याने देत होती.

या प्रकरणाला वळण तेव्हा मिळाले, जेव्हा जिग्नेशचा एक चुलत भाऊ स्वतः ऑस्ट्रेलियात जाण्याच्या तयारीत होता. त्याने जिग्नेशचा पत्ता आणि संपर्क क्रमांक मागितला असता, पृथ्वी उर्फ भूमीबेन सतत वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करत राहिली. संशय बळावल्याने कुटुंबीयांनी २६ जुलै रोजी सिटी 'बी' डिव्हिजन पोलिस ठाण्यात जिग्नेश हरवल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये जिग्नेशच्या बेपत्ता होण्यामागे त्याची पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराचा हात असू शकतो, असा संशय व्यक्त करण्यात आला होता.

त्यानंतर पोलिसांनी पृथ्वीची कसून चौकशी केली असता, तिने निलेश कछाटिया आणि बलवीर वर्मा यांच्या मदतीने जिग्नेशची हत्या केल्याची कबुली दिली. चौकशीत आरोपींनी दरेड जीआयडीसी (Dared GIDC) परिसरातील एका कंपनीच्या शेडमध्ये सुमारे १२ फूट खोल खड्डा खोदून मृतदेह पुरल्याची माहितीही दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, ३१ मे २०२४ रोजी रात्री आरोपींनी जिग्नेशला दारू पार्टीचे आमिष दाखवून दरेड जीआयडीसी परिसरातील कंपनीच्या शेडमध्ये बोलावले. तेथे दारूमध्ये सायनाइड मिसळून त्याला पाजण्यात आले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

या संदर्भात सहाय्यक पोलिस अधीक्षक (ASP) प्रतिभा यांनी सांगितले की, मृत्यूनंतर आरोपींनी सुमारे १२ फूट खोल खड्ड्यात मृतदेह पुरला. त्यावर माती टाकल्यानंतर संपूर्ण जागा सुमारे एक फूट जाड काँक्रीटच्या थराने झाकण्यात आली होती. आरोपींच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या उत्खननात सांगाडा जप्त करण्यात आला असून, तो जिग्नेशचाच असण्याची शक्यता आहे.

मृताची अचूक ओळख पटविण्यासाठी सांगाड्यातील नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच मृतदेह पुरलेल्या ठिकाणचा जाड काँक्रीटचा थर हटविण्यासाठी विशेष यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात पृथ्वी उर्फ भूमीबेन, तिचा कथित प्रियकर निलेश कछाटिया आणि त्यांचा सहकारी बलवीर वर्मा यांना हत्या, पुरावे नष्ट करणे आणि इतर गंभीर आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. प्रेमविवाह झालेल्या जिग्नेशला दोन मुली असून, गेल्या जवळपास दोन वर्षांपासून त्यांचा वडिलांशी कोणताही संपर्क नव्हता. या संपूर्ण प्रकरणातील इतर पुरावे आणि घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रतिभा यांनी दिली.

संबंधित सामग्री

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ५०५३ पानांचे दोषारोपपत्र; लोहगडावर रचलेला कट पोलिस तपासात उघड

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ५०५३ पानांचे दोषारोपपत्र; लोहगडावर रचलेला कट पोलिस तपासात उघड

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ५०५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल. लोहगडाची रेकी, बनावट Instagram अकाऊंट आणि अन्य बाबी तपासात समोर

Sep 20, 2026
रात्री भेटायला गेली... परतलीच नाही; दोन दिवसांनी शेतात आढळला मृतदेह; दिल्लीतील क्रूर हत्याकांड

रात्री भेटायला गेली... परतलीच नाही; दोन दिवसांनी शेतात आढळला मृतदेह; दिल्लीतील क्रूर हत्याकांड

दिल्लीतील स्वरूप नगरमध्ये १६ वर्षीय मुलीची हत्या. ५० हून अधिक CCTV तपासल्यानंतर १९ वर्षीय तरुणाला अटक, तीन अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात.

Sep 18, 2026
सुरतमध्ये 24 वर्षीय निधी सिंहचा घरात मृत्यू; अंतर्वस्त्रांमध्ये सापडली चिठ्ठी;  पती आरोपी

सुरतमध्ये 24 वर्षीय निधी सिंहचा घरात मृत्यू; अंतर्वस्त्रांमध्ये सापडली चिठ्ठी; पती आरोपी

गुजरातमधील सुरतमध्ये 24 वर्षीय विवाहित महिलेच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.

Aug 28, 2026
MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षा रद्द; पेपरफुटीच्या तक्रारीनंतर आयोगाचा मोठा निर्णय

MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षा रद्द; पेपरफुटीच्या तक्रारीनंतर आयोगाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अन्न व औषध प्रशासनातील ‘औषध निरीक्षक’ (गट-ब) पदासाठी राबविण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Aug 26, 2026
मंदिराच्या दानपेटीची चोरी उघडकीसदोन मोटारसायकलीही हस्तगत

मंदिराच्या दानपेटीची चोरी उघडकीसदोन मोटारसायकलीही हस्तगत

Temple Donation Box: केदारनगर देवमाळी येथील श्री गजानन महाराज मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास करण्यासह मोटारसायकल चोरीच्या घटनांचा परतवाडा पोलिसांच्या डी.बी. पथकाने छडा लावला आहे.

Aug 20, 2026