मंदिर दानपेटी चोरी

मंदिराच्या दानपेटीची चोरी उघडकीसदोन मोटारसायकलीही हस्तगत

Temple Donation Box: केदारनगर देवमाळी येथील श्री गजानन महाराज मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास करण्यासह मोटारसायकल चोरीच्या घटनांचा परतवाडा पोलिसांच्या डी.बी. पथकाने छडा लावला आहे.

मंदिराच्या दानपेटीची चोरी उघडकीसदोन मोटारसायकलीही हस्तगत

Temple Donation Box

 

परतवाडा पोलिसांच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई

भाविकांच्या श्रद्धास्थानाची सुरक्षा अबाधित ठेवण्याचा पोलिसांचा निर्धार

परतवाडा (Temple Donation Box) : केदारनगर देवमाळी येथील श्री गजानन महाराज मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास करण्यासह मोटारसायकल चोरीच्या घटनांचा परतवाडा पोलिसांच्या डी.बी. पथकाने छडा लावला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या तपासात एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून मंदिरातील चोरीची रक्कम तसेच चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईमुळे चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून एकूण ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

दिनांक १९ ऑगस्ट रोजी केदारनगर देवमाळी येथील रहिवासी श्रीकृष्ण बाबुराव पोटे यांनी परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, १८ ऑगस्ट रोजी रात्री शेतातून मोटारसायकलने घरी आल्यानंतर त्यांनी वाहन घरासमोर उभे केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहिले असता मोटारसायकल गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

दरम्यान, (Temple Donation Box) घरासमोरच असलेल्या श्री गजानन महाराज मंदिरातील दानपेटीही फोडण्यात आल्याचे समोर आले. दानपेटीतील सुमारे ५ ते ६ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे आढळून आले. एकाच परिसरात मोटारसायकल तसेच मंदिरातील दानपेटी फोडून चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५८१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीने तपासाला मिळाली दिशा
गुन्ह्याचा तपास सुरू असताना परतवाडा पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाला या चोरीमागे एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संबंधित बालकास त्याच्या पालकांच्या उपस्थितीत ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने केदारनगर देवमाळी येथील गजानन महाराज मंदिराच्या दानपेटीतून ५ हजार रुपये, श्रीकृष्ण पोटे यांच्या घरासमोर उभी असलेली मोटारसायकल तसेच यापूर्वी आणखी एक मोटारसायकल चोरी केल्याची माहिती दिली.

पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकली आणि मंदिरातील चोरीची रोकड असा एकूण ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे परतवाडा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ५८१/२०२६ तसेच गुन्हा क्रमांक ५६८/२०२६ असे दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

भाविकांच्या श्रद्धास्थानाला पोलिसांचे संरक्षण
मंदिरातील दानपेटी फोडून चोरी झाल्याने भाविकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, घटनेनंतर अवघ्या काही काळात पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करून चोरीचा छडा लावल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. भाविकांची श्रद्धा, मंदिरांची सुरक्षितता आणि परिसरातील नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण यासाठी पोलिसांची सतर्कता कायम असल्याचे या कारवाईतून अधोरेखित झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सुधीर राऊत करीत आहेत.
       
पोलिसांची कामगिरी
ही (Temple Donation Box) उल्लेखनीय कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, धारणी उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अचलपूर अतिरिक्त प्रभाराचे  माधवराव गरुड आणि परतवाडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सलीम शेख, पोलीस हवालदार सचिन होले, सुधीर राऊत, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रशेखर वानखडे, जितेश बाबील, घनश्याम किरोले, सचिन कोकणे, शुभम शर्मा तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल प्रविण चकोर यांनी सहभाग घेतला. पोलिसांच्या तत्पर तपासामुळे मंदिरातील चोरीसह मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस येऊन चोरीचा मुद्देमाल परत मिळाल्याने परतवाडा पोलिसांच्या डी.बी. पथकाच्या कामगिरीचे नागरिक व भाविकांकडून कौतुक होत आहे.


 

संबंधित सामग्री

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये २० वर्षीय अमन सोनीचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून चार मित्र ताब्यात घेण्यात आले आह

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; उर्वरित २५ हजार रुपये घेताना तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.

Oct 04, 2026