High Court Typing Exam

हायकोर्ट टायपिंग परीक्षेत पेपरफुटीचा आरोप; अभिजीत दीपके यांचे छत्रपती संभाजीनगर कोर्टाबाहेर ठिय्या आंदोलन

NEET आणि TET परीक्षांमधील पेपरफुटीच्या आरोपांनंतर आता हायकोर्टाच्या लिपीक पदासाठी घेण्यात आलेल्या टायपिंग स्किल स्टेट परीक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हायकोर्ट टायपिंग परीक्षेत पेपरफुटीचा आरोप; अभिजीत दीपके यांचे छत्रपती संभाजीनगर कोर्टाबाहेर ठिय्या आंदोलन

High Court Typing Exam

कल्याणमध्ये प्रश्नपत्रिकेतील पॅसेज व्हॉट्सअॅपवर आधीच मिळाल्याचा विद्यार्थ्यांचा दावा; छत्रपती संभाजीनगरमध्ये तांत्रिक अडचणींमुळेही परीक्षार्थी संतप्त

NEET आणि TET परीक्षांमधील पेपरफुटीच्या आरोपांनंतर आता हायकोर्टाच्या लिपीक पदासाठी घेण्यात आलेल्या टायपिंग स्किल स्टेट परीक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. परीक्षेतील पॅसेज आधीच व्हॉट्सअॅपवर उपलब्ध झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या प्रकरणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील कोर्टाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले असून, मोठ्या संख्येने तरुण या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

कल्याणमध्ये हायकोर्ट टायपिंग परीक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी पेपरफुटीचा गंभीर आरोप केला आहे. परीक्षेतील पॅसेज परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअॅपवर मिळाल्याचा दावा विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. मूळ पॅसेज व्हॉट्सअॅपवर प्रसारित होत असल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. कल्याण येथून परीक्षा दिलेल्या एका उमेदवाराने अभिजीत दीपके यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली. यावेळी संबंधित विद्यार्थी भावुक झाल्याचेही समोर आले.

या आरोपांनंतर अभिजीत दीपके यांनी फेरपरीक्षेची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांनी जोपर्यंत री-एक्झाम होत नाही, तोपर्यंत आंदोलनस्थळ सोडू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच जिल्हा न्यायाधीशांचे संबंधित अधिकारी परीक्षेसंदर्भात खाली येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका त्यांनी मांडली. हेच आपले 'जंतर-मंतर' असल्याचेही दीपके यांनी म्हटले.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील सुराणा नगर परिसरातील Bytez's Infotech परीक्षा केंद्रावर हायकोर्ट टायपिंग स्किल स्टेट परीक्षेदरम्यान वेगळ्याच कारणामुळे गोंधळ निर्माण झाला. टायपिंगसाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर व्यवस्थित कार्यरत नसल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे. सकाळी 10 वाजता परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचलेले विद्यार्थी बराच काळ परीक्षा सुरू होण्याची प्रतीक्षा करत होते. त्यानंतर दुपारी 12.15 वाजता दुसरी बॅच सुरू होणार होती.

पहिल्याच बॅचमध्ये तांत्रिक अडथळे निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढली. टायपिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले कीबोर्ड जुने असल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला. तसेच संगणकाच्या स्क्रीनवरील फॉन्ट अत्यंत लहान असल्याने टायपिंग करताना अडचणी येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तांत्रिक समस्यांमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेरील रस्त्यावर आंदोलन सुरू केले. परिस्थितीची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तांत्रिक अडचणी असलेल्या केंद्रावर परीक्षा न घेता कोर्टातच परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे. परीक्षेतील तांत्रिक समस्यांमुळे उमेदवारांचा वेळ आणि कामगिरी बाधित होऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे.

एकीकडे कल्याणमध्ये पेपरफुटीचा आरोप, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षा प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटींमुळे निर्माण झालेला गोंधळ यामुळे हायकोर्ट टायपिंग स्किल स्टेट परीक्षेच्या पारदर्शकतेवर विद्यार्थ्यांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत.

संबंधित सामग्री

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

नाशिक धर्मांतर प्रकरणातील निदा खानसमोर वैवाहिक संकट. आठ महिन्यांची गर्भवती असताना पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून १६ ऑक्टोबरला कोर्टात हजेरी आहे.

Oct 04, 2026
MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला.

Oct 02, 2026
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

MPSCने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली. स्थापत्य अभियांत्रिकी आणि गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार.

Sep 29, 2026