MPSC Exam 2026

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

MPSCने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली. स्थापत्य अभियांत्रिकी आणि गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

MPSC Exam 2026

राज्यसेवा मुख्य परीक्षेसह स्थापत्य अभियांत्रिकी आणि गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती; प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम कायम

MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 संदर्भात मोठा निर्णय घेतला असून, 3 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत नियोजित असलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक आगामी काही दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने प्रसिद्धिपत्रकातून स्पष्ट केले आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षेसोबतच महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2026 आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2026 या दोन्ही परीक्षांनाही स्थगिती देण्यात आली आहे. या तिन्ही परीक्षांच्या नव्या तारखा नंतर जाहीर करण्यात येणार आहेत.

दरम्यान, पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर आगामी परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आला होता. प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेबाबत उमेदवारांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. आगामी मुख्य परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका नव्याने तयार कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती.

मात्र, सध्या तयार असलेल्या प्रश्नपत्रिका रद्द करून नव्याने प्रश्नपत्रिका तयार केल्या जाणार आहेत का, याबाबत MPSCकडून अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे परीक्षा स्थगित झाल्यानंतरही प्रश्नपत्रिकांच्या मुद्द्यावर उमेदवारांमध्ये संभ्रम कायम आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 काही दिवसांवर आली असताना प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीरपणे समोर आला होता. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका नव्याने सेट करण्याची मागणी आयोगाकडे केली होती. गरज भासल्यास परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणीही करण्यात आली होती.

याचदरम्यान, राज्यसेवा 2025 च्या मुख्य परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनावर काही विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी आक्षेप नोंदवले आहेत. या आक्षेपांची दखल घेत MPSCने उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच राज्यातील विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतींचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. राज्यभरातील परीक्षार्थी आणि संबंधित घटकांशी चर्चा करून आदर्श परीक्षा पद्धतीबाबत शिफारशी या समितीकडून करण्यात येणार आहेत.

या सर्व घडामोडींमुळे राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटना तसेच काही लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होती. अखेर या मागणीची दखल घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना परीक्षेच्या नव्या तारखांची माहिती मिळणार आहे.

संबंधित सामग्री

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला.

Oct 02, 2026
65 हजार 866 सरकारी पदांची भरती रखडली; उमेदवारांमध्ये असंतोष

65 हजार 866 सरकारी पदांची भरती रखडली; उमेदवारांमध्ये असंतोष

MPSC Recruitment Process: राज्यातील विविध शासकीय विभागांमधील तब्बल 65 हजार 866 रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला विलंब होत आहे. अनेक विभागांकडून आवश्यक मागणीपत्रे अद्याप पूर्णपणे सादर नाही...

Sep 22, 2026
MPSC राज्यसेवा २०२५च्या मुलाखती पुढे ढकलल्या; २०२६ मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांबाबत विद्यार्थ्यांचा संभ्रम कायम

MPSC राज्यसेवा २०२५च्या मुलाखती पुढे ढकलल्या; २०२६ मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांबाबत विद्यार्थ्यांचा संभ्रम कायम

MPSC राज्यसेवा २०२५च्या मुलाखती पुढे ढकलल्या. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६च्या प्रश्नपत्रिकांबाबत विद्यार्थ्यांनी नव्याने पेपर सेट करण्याची मागणी केली आहे.

Sep 17, 2026
SET परीक्षा पुन्हा लांबणीवर; आता २५ ऑक्टोबरला परीक्षा, तिसऱ्यांदा वेळापत्रकात बदल

SET परीक्षा पुन्हा लांबणीवर; आता २५ ऑक्टोबरला परीक्षा, तिसऱ्यांदा वेळापत्रकात बदल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ४१ वी SET परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता परीक्षा २५ ऑक्टोबरला होणार असून वेळापत्रकात तिसऱ्यांदा बदल झाला आहे.

Sep 15, 2026