Cockroach Janata Party

CJPच्या 2 ऑक्टोबरच्या आंदोलनाला पोलिसांचा नकार; अभिजीत दिपकेंचा ‘जेल भरो’चा इशारा

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून देशात राजकीय वाद सुरू असतानाच आता कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आंदोलनाची घोषणा केली आहे.

CJPच्या 2 ऑक्टोबरच्या आंदोलनाला पोलिसांचा नकार; अभिजीत दिपकेंचा ‘जेल भरो’चा इशारा

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात दादरच्या शिवाजी पार्कमध्ये आंदोलनाची तयारी; सोनम वांगचुक यांचा पाठिंबा

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून देशात राजकीय वाद सुरू असतानाच आता कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आंदोलनाची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत 2 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईत आंदोलन करण्याची तयारी CJPने केली होती. मात्र या प्रस्तावित आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे.

CJPच्या वतीने दादर येथील शिवाजी पार्कमध्ये आंदोलन आयोजित करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे पूर्वपरवानगी मागण्यात आली होती. राष्ट्रीय संगठन प्रमुख अजिंक्य शिंदे यांनी यासंदर्भात पोलिसांना पत्र दिले होते. प्रस्तावित आंदोलन संविधानाच्या चौकटीत आणि शांततापूर्ण पद्धतीने केले जाईल, असे या पत्रात नमूद करण्यात आले होते.

दरम्यान, पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी Xवरील पोस्टमधून आपली भूमिका मांडली. आंदोलनाचा अधिकार नाकारला गेल्यास गांधी जयंतीच्या दिवशी ‘जेल भरो’ आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबरला CJPकडून पुढील कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

CJPने यापूर्वीच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 25 सप्टेंबरला पक्षाने 2 ऑक्टोबरपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली होती. हे आंदोलन पुढे देशातील इतर शहरांमध्ये नेण्याची भूमिका CJPने मांडली होती.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही CJPच्या 2 ऑक्टोबरच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र आपण या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होऊच, असे निश्चित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रियेत आणि देशातील व्यवस्थेत उत्तरदायित्व वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा असल्याचे वांगचुक यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाच्या निर्णयांबाबत सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर CJPने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. निवडणूक आयुक्त एस. एस. संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार नोंदणी, नावांची वगळणी तसेच पुनर्स्थापना आणि विशेष सखोल पुनरिक्षणाबाबत (SIR) काही निर्णयांवर आक्षेप घेतल्याचा दावा एका वृत्तात करण्यात आला होता. दुसरीकडे, निवडणूक आयोगाने SIRशी संबंधित निर्णय तिन्ही आयुक्तांच्या सर्वसंमतीने झाल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर कॉकरोच जनता पार्टी पुढे कोणती पावले उचलणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे. 2 ऑक्टोबरच्या प्रस्तावित आंदोलनाबाबत CJPची पुढील भूमिका आणि पोलिस प्रशासनाची भूमिका याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

संबंधित सामग्री

‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

सुधारित Form 6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नसल्याचे CJI सूर्यकांत यांनी स्पष्ट केले. SIRच्या १४ निर्णयांवर याचिकेत सवाल; निवडणूक आयोगाला नोटीस.

Oct 05, 2026
SIRच्या १४ निर्णयांवरून ज्ञानेश कुमार अडचणीत? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

SIRच्या १४ निर्णयांवरून ज्ञानेश कुमार अडचणीत? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

CEC ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाच्या मागणीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने अंतरिम आदेशास नकार देत निवडणूक आयोग आणि केंद्राला नोटीस बजावली.

Oct 05, 2026
अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; उर्वरित २५ हजार रुपये घेताना तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.

Oct 04, 2026
जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026