अवैध गोवंश वाहतुक

कन्हान येथे अवैध गोवंश वाहतुकीवर स्थागुशा नागपुर ग्रामिण पोलिसांची कारवाई

Illegal Cattle Transport: पोलिसांनी अवैधरीत्या गोवंश जनावरांची वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून ११ गोवंश जनावरांची सुटका केली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली

कन्हान येथे अवैध गोवंश वाहतुकीवर स्थागुशा नागपुर ग्रामिण पोलिसांची कारवाई

Illegal Cattle Transport

 

२८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ११ गोवंशांची सुटका, दोघे अटकेत

कन्हान (Illegal Cattle Transport) : पोलिसांनी अवैधरीत्या गोवंश जनावरांची वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून ११ गोवंश जनावरांची सुटका केली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांच्याविरुद्ध कन्हान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
             
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कन्हान हद्दीतील तारसा रोड येथे नाकाबंदी करण्यात आली होती. या वेळी संशयित ट्रक क्र. एमएच-४०/सीटी-७८९३ पोलि सांना दिसला. (Illegal Cattle Transport) पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता काही अंतरा वर वाहन सोडुन पळ काढला. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये ११ गोवंश जनावरे आढळुन आली. जनावरांना चारापाण्याची सोय न करता, कमी जागेत दाटीवाटीने कोंबुन, शिंगाला व पायाला आखुड दोरखं डाने बांधुन वाहतुक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळाची पाहणी करून ट्रकसह गोवंश जनावरे ताब्यात घेतली. या (Illegal Cattle Transport) कारवाईत ट्रक किंमत २० लाख रुपये, ११ गोवंश जनावरे किंमत २ लाख ८० हजार रुपये, टोयोटा ग्ला न्जा कार किंमत ६ लाख रुपये व एक अँड्रॉइड मोबाई ल किंमत १० हजार रुपये असा एकुण २८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी इर्शाद अब्दुल सय्यद वय ३५ वर्ष, रा. कामठी आणि मोहम्मद रियाज अब्दुल रहीम कुरेशी वय ३९ वर्ष, रा. कामठी यांना अटक करण्यात आली.

तसेच ट्रक चालकाविरुद्ध कन्हान पोलीस ठाण्यात कलम ११(१), (क), (ड), (ज), (ई), (फ) प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६०, सहकलम ५(अ), (१) महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलिसांच्या कारवाई मुळे अवैध गोवंश वाहतुक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असुन पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहेत.

संबंधित सामग्री

हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोलीत दोन छाप्यांत गुटखा व तंबाखूसह ३४ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका कारवाईत आरोपीला पकडले, तर दुसऱ्या कारवाईत आरोपी पसार झाले.

Sep 19, 2026
गिरामवाडी शेत शिवारात झन्ना मन्ना जुगारावर छापा

गिरामवाडी शेत शिवारात झन्ना मन्ना जुगारावर छापा

Giramwadi Gambling Raid: तालुक्यातील गिरामवाडी शिवारात सुरू असलेल्या झन्ना मन्ना जुगारावर १ सप्टेंबरला पोलिसांनी छापा मारून १ लाख ७ हजार ६४० रुपयाचा मुद्देमाल जप्त

Sep 01, 2026
परभणीत कत्तलीसाठी घेऊन जाणारे २८ गोवंश पोलिसांच्या ताब्यात; ३३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

परभणीत कत्तलीसाठी घेऊन जाणारे २८ गोवंश पोलिसांच्या ताब्यात; ३३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

पालम तालुक्यात गोवंशाची निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी पालम पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Aug 28, 2026
गुन्हे दाखल करून तरुणांचा आवाज दाबता येणार नाही!

गुन्हे दाखल करून तरुणांचा आवाज दाबता येणार नाही!

Latur CJP Agitation: गुन्हे दाखल करून तरुणांचा आवाज दाबता येणार नाही, असा इशारा देत सीजेपी आंदोलनासाठी वकिलांची फौज तयार आहे, अशी भूमिका एडवोकेट उदय गवारे यांनी एका पत्रकांन्वये

Aug 23, 2026
परभणीत बोलेरोतून देशी दारूची वाहतूक; पालम पोलिसांची कारवाई

परभणीत बोलेरोतून देशी दारूची वाहतूक; पालम पोलिसांची कारवाई

परभणीतील पालम तालुक्यातील पेठपिंपळगाव ते पालम रोडवरील जगदंबा हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर कारवाई करत पोलिसांनी बोलेरो वाहनातून नेण्यात येत असलेली अवैध देशी दारू जप्त केली आहे.

Aug 22, 2026