Cattle Rescue

परभणीत कत्तलीसाठी घेऊन जाणारे २८ गोवंश पोलिसांच्या ताब्यात; ३३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

पालम तालुक्यात गोवंशाची निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी पालम पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

परभणीत कत्तलीसाठी घेऊन जाणारे २८ गोवंश पोलिसांच्या ताब्यात; ३३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

Cattle Rescue

पालम पोलिसांची मोजमाबाद परिसरात कारवाई; दोन कंटेनर चालकांसह गोवंशाच्या मालकांविरुद्ध गुन्हा, आरोपींना अटक

परभणी : पालम तालुक्यात गोवंशाची निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी पालम पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या २८ बैलांची सुटका करण्यात आली असून, या कारवाईत कंटेनरसह एकूण ३३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी दुपारी मोजमाबाद परिसरात ही कारवाई करण्यात आली.

मोजमाबाद ते माळेगाव मार्गावरून एम.एच.०४ जी.आर. ००५३ क्रमांकाच्या कंटेनरमधून गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती पालम पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित कंटेनर अडवून ताब्यात घेतला. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये २८ बैलांची निर्दयपणे वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.

कारवाईदरम्यान सुमारे १५ लाख रुपये किमतीचा कंटेनर आणि अंदाजे १८ लाख ६० हजार रुपये किमतीचे २८ बैल, असा एकूण ३३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी खलील अहमद गुलाम कादीर (वय ४३, रा. गुलशन नगर, मालेगाव, जि. नाशिक) आणि करीम समद शेख (वय ५०, रा. शाफेपुर, छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह गोवंशाच्या मालकांविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस शिपाई सुदाम धुळगुंडे यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणाची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम चिटेवार पुढील तपास करीत आहेत.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे-राऊतांवर पलटवार; पुराव्याशिवाय आरोप होत असल्याचा दावा करत दिशा सालियन प्रकरणावरही सवाल.

Oct 02, 2026