कळमनुरी (Giramwadi Gambling Raid) : तालुक्यातील गिरामवाडी शिवारात सुरू असलेल्या झन्ना मन्ना जुगारावर १ सप्टेंबरला पोलिसांनी छापा मारून १ लाख ७ हजार ६४० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. कळमनुरी तालुक्यातील सांडस ते पार्डी मोड रस्त्याच्या एका टिनशेडच्या पाठीमागे १ सप्टेंबरला झन्ना मन्ना जुगार सुरू होता. कळमनुरी पोलिसांनी मारलेल्या छाप्यात १ लाख ७ हजार ६४० रुपयाचा मुुद्देमाल जप्त करण्यात आला.
या (Giramwadi Gambling Raid) प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक विकास आडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पांडुरंग विठ्ठल सरकंडे, उत्तम यादवराव सरकुंडे रा. कुंभारवाडी, बालाजी नागोराव कर्जतकर रा. गिरामवाडी, विकास किसन सुतारे रा. सांडस या तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शेळके हे करीत आहेत. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडले.
गिरामवाडी शेत शिवारात झन्ना मन्ना जुगारावर छापा
Giramwadi Gambling Raid: तालुक्यातील गिरामवाडी शिवारात सुरू असलेल्या झन्ना मन्ना जुगारावर १ सप्टेंबरला पोलिसांनी छापा मारून १ लाख ७ हजार ६४० रुपयाचा मुद्देमाल जप्त
Giramwadi Gambling Raid
संबंधित सामग्री
हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त
हिंगोलीत दोन छाप्यांत गुटखा व तंबाखूसह ३४ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका कारवाईत आरोपीला पकडले, तर दुसऱ्या कारवाईत आरोपी पसार झाले.
गुन्हे दाखल करून तरुणांचा आवाज दाबता येणार नाही!
Latur CJP Agitation: गुन्हे दाखल करून तरुणांचा आवाज दाबता येणार नाही, असा इशारा देत सीजेपी आंदोलनासाठी वकिलांची फौज तयार आहे, अशी भूमिका एडवोकेट उदय गवारे यांनी एका पत्रकांन्वये
परभणीत बोलेरोतून देशी दारूची वाहतूक; पालम पोलिसांची कारवाई
परभणीतील पालम तालुक्यातील पेठपिंपळगाव ते पालम रोडवरील जगदंबा हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर कारवाई करत पोलिसांनी बोलेरो वाहनातून नेण्यात येत असलेली अवैध देशी दारू जप्त केली आहे.
झन्ना-मन्ना जुगारावर छापा; पाच जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल
तालुक्यातील वाकोडी शिवारात झन्ना-मन्ना जुगारावर पोलिसांनी छापा मारून पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून, १ लाख २ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
परभणीत ‘तिर्रट’ जुगारावर छापा; ६ दुचाकी, ३ मोबाईलसह ३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त
गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणीसावरगाव येथे ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला.