महिला आत्महत्या घटना

शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वडगांव साखरा शेत शिवारात महिलेने घेतला गळफास

Women Suicide Case: शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साखरा वडगाव शेत परिसरात एका निंबाचा झाडाला विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडलेली आहे.

शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वडगांव साखरा शेत शिवारात महिलेने घेतला गळफास

Women Suicide Case

वरोरा (Women Suicide Case) : शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साखरा वडगाव शेत परिसरात एका निंबाचा झाडाला विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारच्या सुमारास शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या साखरा वडगाव शेत शिवारात दुपारचा सुमारास लिंबाच्या झाडाला ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत विवाहित महिलेचे प्रेत परिसरात काम करत असलेल्या शेतकऱ्यांना आढळून आले. घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली.

घटनेची माहिती शेगाव पोलिसांना देण्यात आल्या नतर पोलिसांनी घटनास्थळ पोहचून पंचनामा करत मृतदेह उत्तरणी तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा या ठिकाणी पाठवण्यात आले. दरम्यान मृतक महिला हीची ओळख होत नसल्याने शेगाव पोलीस यांनी वेगानी चक्र फिरवत गिरड पोलीस यांच्याशी संपर्क करून मृतक महिलेची ओळख पटवली. गळफास घेतलेले महिलेचे नाव मयुरी हरीदास सुपारे असे असून वय वर्ष 27 वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील खेक येथील असल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले. दरम्यान घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनास पि. एस. आय कांबळे व शेगाव पोलीस करीत आहे.

 घातपात असल्याचा संशय 
सदर महिला २५फूट असलेल्या पळसाच्या  झाडावर चडून  आपल्याला ओढणीने गळफास कसा लावेल असा संशय व्यक्त होत असून ह्याबाबत पोलीस सखोल चौकशी सुरु असल्याचे कळते.

संबंधित सामग्री

वायगावात ५० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

वायगावात ५० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

Vaigaon Person Suicide:  तालुक्यातील वायगाव येथे ५० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरातील खोलीच्या स्लॅबच्या कडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

Aug 30, 2026
शेतकरी कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने शेतकर्‍याची आत्महत्या

शेतकरी कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने शेतकर्‍याची आत्महत्या

Farmer suicide case: तालुक्यातील चिंचोली निळोबा येथील शेतकरी भगवान त्र्यंबकराव मोरे वय ५५ वर्षे या शेतकर्‍याकडे विविध बँकेचे कर्ज होते परंतु नुकत्याच झालेल्या शेतकरी कर्जमाफीच्या यादीत त्यांचे नाव

Aug 21, 2026
परभणीच्या भोसी येथील युवकाने नैराश्यातून घेतला गळफास

परभणीच्या भोसी येथील युवकाने नैराश्यातून घेतला गळफास

Maratha Reservation Suicide: मयताच्या खिश्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा, अशा आशयाची चिठ्ठी आढळून आली आहे. या प्रकरणी बामणी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Aug 10, 2026