मराठी आरक्षण आत्महत्या

परभणीच्या भोसी येथील युवकाने नैराश्यातून घेतला गळफास

Maratha Reservation Suicide: मयताच्या खिश्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा, अशा आशयाची चिठ्ठी आढळून आली आहे. या प्रकरणी बामणी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

परभणीच्या भोसी येथील युवकाने नैराश्यातून घेतला गळफास

Maratha Reservation Suicide

 

मराठा आरक्षणासंदर्भात मृताच्या खिशात आढळली चिठ्ठी; आकस्मात मृत्यूची नोंद

परभणी (Maratha Reservation Suicide) : जिंतूर  तालुक्यातील बामणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भोसी येथे एका  ३० वर्षीय युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. गणेश आश्रोबा ठोंबरे असे मृत युवकाचे नाव आहे. मयताच्या खिश्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा, अशा आशयाची चिठ्ठी आढळून आली आहे. या प्रकरणी बामणी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गणेश ठोंबरे यांनी रविवार ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नातेवाइकांनी त्यांना तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी मुंडे यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. (Maratha Reservation Suicide) घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान, बामणी पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात जाऊन प्राथमिक पंचनामा केला. यावेळी मृताच्या खिशात मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून मी फाशी घेत आहे.

सरकारने लवकर आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशा आशयाची चिट्ठी पोलिसांना आढळून आली. मृताच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश ठोंबरे हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्यात होते. याच कारणातून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी बामणी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हवालदार ठाकूर करीत आहेत. सोमवार १० ऑगस्ट रोजी सकाळी गणेश ठोंबरे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदनानंतर नातेवाइकांना मृतदेह स्वाधीन करण्यात आला. 

शासकीय मदतीची मागणी

गणेश ठोंबरे यांचे चुलत भाऊ तथा पंचायत समिती सदस्य भास्करराव ठोंबरे यांनी सांगितले की, मागील दोन-तीन दिवसांपासून गणेश हे ‘मराठा समाजाच्या आरक्षणाचा काहीच उपयोग होत नाही,’ असे म्हणत होते. त्यामुळे ते नैराश्यात होते, असा दावा त्यांनी केला. गणेश यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शासनाने कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरी तसेच आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भास्करराव ठोंबरे यांनी केली. यासाठी आपणही पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

मराठा आरक्षणासाठी युवकाचे टोकाचे पाऊल; विजेची तार पकडून संपविली जीवनयात्रा

मराठा आरक्षणासाठी युवकाचे टोकाचे पाऊल; विजेची तार पकडून संपविली जीवनयात्रा

Maratha reservation Suicide Case: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलनाचा प्रवाह सुरू असतानाच वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे एका युवकाने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना

Sep 21, 2026
मराठा आरक्षणासाठी लातूरमध्ये एकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

मराठा आरक्षणासाठी लातूरमध्ये एकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

Maratha Reservation Suicide: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात पेटलेला वणवा अधिकच तीव्र झाला असून, लातूर जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे.

Sep 08, 2026
मराठा आरक्षण व हैद्राबाद गॅझेटसाठी एकाची गळफास घेऊन आत्महत्या

मराठा आरक्षण व हैद्राबाद गॅझेटसाठी एकाची गळफास घेऊन आत्महत्या

Maratha Reservation Suicide: वसमत तालुक्यातील बळेगाव येथील ४८ वर्षीय व्यक्तीने मराठा आरक्षण व हैद्राबाद गॅझेटसाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने हट्टा पोलिस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिय

Jun 04, 2026