शेतकरी आत्महत्या प्रकरण

शेतकरी कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने शेतकर्‍याची आत्महत्या

Farmer suicide case: तालुक्यातील चिंचोली निळोबा येथील शेतकरी भगवान त्र्यंबकराव मोरे वय ५५ वर्षे या शेतकर्‍याकडे विविध बँकेचे कर्ज होते परंतु नुकत्याच झालेल्या शेतकरी कर्जमाफीच्या यादीत त्यांचे नाव

शेतकरी कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने शेतकर्‍याची आत्महत्या

Farmer suicide case

 

औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोंबा येथील घटना

औंढा नागनाथ (Farmer suicide case) : तालुक्यातील चिंचोली निळोबा येथील शेतकरी भगवान त्र्यंबकराव मोरे वय ५५ वर्षे या शेतकर्‍याकडे विविध बँकेचे कर्ज होते परंतु नुकत्याच झालेल्या शेतकरी कर्जमाफीच्या यादीत त्यांचे नाव आले नसल्याने कर्जाच्या विवंचणेतून त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चिंचोली निळोबा येथील शेतकरी भगवान त्रंबकराव मोरे वय ५५ वर्षे यांच्याकडे विविध बँकेचे कर्ज होते परंतु नुकत्याच झालेल्या शेतकरी कर्जमाफीच्या यादीत भगवानराव मोरे यांचं नाव न आल्याने कर्जाच्या विवंचनेतून त्यांनी २० ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास विषारी औषध प्रशन केले यानंतर ग्रामस्थांनी त्यांना परभणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले परंतु उपचार सुरू असताना रात्री दीड वाजे दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. २१ ऑगस्टला सकाळी परभणीत मयताचे शवविच्छदेन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. दुपारी शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले.

औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे जमादार इमरानुद्दीन सिद्दिकी यांनी रुग्णालयात भेट देऊन पंचनामा केला. आत्महत्याग्रस्त शेतकरी भगवान त्रंबकराव मोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

संबंधित सामग्री

रिसोडमध्ये 'महसूल सेवा समाधान शिबिर' संपन्न; एकाच छताखाली २४६४ दाखल्यांचे वाटप

रिसोडमध्ये 'महसूल सेवा समाधान शिबिर' संपन्न; एकाच छताखाली २४६४ दाखल्यांचे वाटप

Mahsul Seva Samadhan: शिबीराच्या माध्यमातून शासनाच्या विविध ३० स्टॉल्सवरून २,४६४ दाखल्यांचे तात्काळ वाटप करण्यात आले, तसेच नागरिकांच्या अनेक प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला.

Jul 27, 2026
कर्ज आणि वीज बिल माफीमुळे बळीराजा आर्थिक संकटातून बाहेर; आ. तान्हाजी मुटकुळे यांची माहिती 

कर्ज आणि वीज बिल माफीमुळे बळीराजा आर्थिक संकटातून बाहेर; आ. तान्हाजी मुटकुळे यांची माहिती 

MLA Tanhaji Mutkule: कर्ज आणि वीज बिल माफीमुळे बळीराजा आर्थिक संकटातून बाहेर पडला असल्याची माहिती आ. तान्हाजी मुटकुळे यांनी २५ जुलै शनिवार रोजी भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद

Jul 25, 2026
सरकारची कर्जमुक्ती शेतकऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी!

सरकारची कर्जमुक्ती शेतकऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी!

Farmer Loan Waiver Scheme: शेतकरी संघटनाने आरोप दिले की कर्जदार व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकर्यांना भेदभात झाला आहे. सारसकट मुकतीची मागणी केली गेल्यामुळे शेतकऱ्यांचा आंदोलन

Jul 02, 2026
कर्जमुक्तीसाठी मराठवाड्यात १६ जून रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली 

कर्जमुक्तीसाठी मराठवाड्यात १६ जून रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली 

Debt-Waiver Tractor Rally: मराठवाड्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ जूनला कर्जमुक्तीसाठी ट्रॅक्टर रॅली झाल्याविषयी चर्चा होईल. शिवसेनेने मागितलेल्या अटांना पाळण्याच्या आशयासह शासनाने प्रतिक्रिया

Jun 14, 2026
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ‘अन्नत्याग’ आंदोलन अहमदपूरमध्ये

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ‘अन्नत्याग’ आंदोलन अहमदपूरमध्ये

Farmers' Hunger Strike: 'अन्नत्याग' आंदोलनात शेतकर्यांना २०१९पासूनच उलटलेल्या करजमाफीचा लाभ व करजसुलतीच्या ५०,००० रु. मर्यादेचे बाधक काढण्यासाठी आवाज उठविण्यात येणार.

Jun 14, 2026