देशी दारू विक्री

विनापरवाना देशी दारू विक्री; पोलिसांची कारवाई, गुन्हा दाखल

Country Liquor Sale: स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देशी दारू ‘भिंगरी संत्रा’ या ब्रँडच्या 90 एमएलच्या 50 सिलबंद प्लास्टिक बाटल्या विनापरवाना बाळगून त्यांची चोरटी विक्री करत असल्याची माहिती

विनापरवाना देशी दारू विक्री; पोलिसांची कारवाई, गुन्हा दाखल

Country Liquor Sale

कळमनुरी (Country Liquor Sale) : शहरातील नवीन बसस्थानक परिसरात विनापरवाना देशी दारूची विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. देवासिंग अमरसिंग बावरी (वय 45 वर्षे, रा. इंदिरा नगर, दि. 23 जून 2026 रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास नवीन बसस्थानकासमोर आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देशी दारू ‘भिंगरी संत्रा’ या ब्रँडच्या 90 एमएलच्या 50 सिलबंद प्लास्टिक बाटल्या विनापरवाना बाळगून त्यांची चोरटी विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईत आरोपीकडून प्रत्येकी 60 रुपये किमतीच्या 50 बाटल्या असा एकूण 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी  पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि जमीर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस हवालदार दिलीप पोले करीत आहेत.

संबंधित सामग्री

हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोलीत दोन छाप्यांत गुटखा व तंबाखूसह ३४ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका कारवाईत आरोपीला पकडले, तर दुसऱ्या कारवाईत आरोपी पसार झाले.

Sep 19, 2026
गिरामवाडी शेत शिवारात झन्ना मन्ना जुगारावर छापा

गिरामवाडी शेत शिवारात झन्ना मन्ना जुगारावर छापा

Giramwadi Gambling Raid: तालुक्यातील गिरामवाडी शिवारात सुरू असलेल्या झन्ना मन्ना जुगारावर १ सप्टेंबरला पोलिसांनी छापा मारून १ लाख ७ हजार ६४० रुपयाचा मुद्देमाल जप्त

Sep 01, 2026
गुन्हे दाखल करून तरुणांचा आवाज दाबता येणार नाही!

गुन्हे दाखल करून तरुणांचा आवाज दाबता येणार नाही!

Latur CJP Agitation: गुन्हे दाखल करून तरुणांचा आवाज दाबता येणार नाही, असा इशारा देत सीजेपी आंदोलनासाठी वकिलांची फौज तयार आहे, अशी भूमिका एडवोकेट उदय गवारे यांनी एका पत्रकांन्वये

Aug 23, 2026
परभणीत बोलेरोतून देशी दारूची वाहतूक; पालम पोलिसांची कारवाई

परभणीत बोलेरोतून देशी दारूची वाहतूक; पालम पोलिसांची कारवाई

परभणीतील पालम तालुक्यातील पेठपिंपळगाव ते पालम रोडवरील जगदंबा हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर कारवाई करत पोलिसांनी बोलेरो वाहनातून नेण्यात येत असलेली अवैध देशी दारू जप्त केली आहे.

Aug 22, 2026
झन्ना-मन्ना जुगारावर छापा; पाच जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

झन्ना-मन्ना जुगारावर छापा; पाच जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

तालुक्यातील वाकोडी शिवारात झन्ना-मन्ना जुगारावर पोलिसांनी छापा मारून पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून, १ लाख २ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Aug 22, 2026