परभणी अपघाती मृत्यू

परभणीत इंधनाच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Parbhani Accidental Death: परभणी-गंगाखेड रोडवर इंधन टँकरने वेगाने चालत दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार डिगांबर कदम यांचा मृत्यू झाला, टँकर चालकावर गुन्हा दाखल.

परभणीत इंधनाच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Parbhani Accidental Death

 

परभणी-गंगाखेड रोडवर सिंगणापूर फाट्याजवळ अपघात

परभणी (Parbhani Accidental Death) : दैठणा  भरधाव वेगातील इंधनाच्या टँकरने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार ९ जून रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास परभणी - गंगाखेड रोडवर सिंगणापूर फाट्या जवळ घडली. सदर प्रकरणी आरोपी टँकर चालकावर दैठणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  माणिक आप्पाराव कदम यांनी फिर्याद दिली आहे. डिगांबर पिराजी कदम वय २५ वर्ष, असे मयताचे नाव आहे. डिगांबर कदम हे एम.एच. १४ इ.टी.  ६३३१ या दुचाकीने तिरुपती पेट्रोलपंप येथून सिंगणापूरकडे जात होते. यावेळी परभणीहून गंगाखेडकडे जाणार्‍या एम.एच. ४४ ए.जे. ७४७७ या क्रमांकाच्या इंधनाच्या टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली.

अपघातात गंभीर जखमी होऊन डिगांबर कदम यांचा मृत्यू झाला. (Parbhani Accidental Death) अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळा वरुन पसार झाला. या प्रकरणी टँकर चालक लहुकुमार धोंडिबा पुरी याच्यावर दैठणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. मुंढे करत आहेत. अपघाताची माहिती कळताच सपोनि. जी.जी. सोनेत, पोलीस अंमलदार विठ्ठल कुंडगीर, आशुतोष जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

Mini Truck-Motorcycle Accident: शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

Oct 05, 2026
वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसच्या धडकेत १६ वर्षीय रोहित कुदळेचा मृत्यू झाला. बहिण रिया गंभीर जखमी असून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

Oct 01, 2026
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण; ४ दिवसांत गुंतवणूकदारांचे ₹१४ लाख कोटी बुडाले

शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण; ४ दिवसांत गुंतवणूकदारांचे ₹१४ लाख कोटी बुडाले

शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण. चार दिवसांत सेन्सेक्स २७०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे ₹१४ लाख कोटी बुडाले.

Sep 29, 2026