मिनीडोर-मोटारसायकल अपघात

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

Mini Truck-Motorcycle Accident: शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

Mini Truck-Motorcycle Accident

कळमनुरी (Mini Truck-Motorcycle Accident) : शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. या (Mini Truck-Motorcycle Accident) अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकल क्रमांक एमएच ३७ एए ४२३७ आणि मिनीडोर क्रमांक एमएच २६ एडी ९४५३ यांच्यात ग्रीनपार्कजवळ समोरासमोर धडक झाली. धडकेत मोटारसायकलवरील मंजुळ गंगाराम मंडळकर (वय ४०, रा. वाशिम) हे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच फौजदार मदन गव्हाणे, कैलास गुंजकर , लक्ष्मीकांत माखणे विलास बांगर या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मंडळकर यांना तातडीने कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या (Mini Truck-Motorcycle Accident) अपघातामुळे हिंगोली-नांदेड मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया कळमनुरी पोलिसांकडून सुरू होती.