Baramati Murder Attempt

बारामतीत ‘दृश्यम’सारखा थरार! पतीला गुंगीचे औषध देऊन जिवंत पुरण्याचा प्रयत्न; डायल 112 मुळे कट उधळला

बारामती शहरात समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

बारामतीत ‘दृश्यम’सारखा थरार! पतीला गुंगीचे औषध देऊन जिवंत पुरण्याचा प्रयत्न; डायल 112 मुळे कट उधळला

Baramati Murder Attempt

क्रिकेट बॅटने मारहाण केल्यानंतर घरातील सिमेंटच्या कट्ट्यात पुरण्याचा आरोप; 38 वर्षीय पत्नीविरोधात गुन्हा दाखल

बारामती शहरात समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पतीला ठार मारल्यानंतर त्याचा मृतदेह लपवण्यासाठी घरातच बांधकाम करण्याच्या ‘दृश्यम’ चित्रपटातील प्रसंगाची आठवण करून देणारा प्रकार प्रत्यक्षात घडल्याचा आरोप आहे. मात्र, पोलिसांना मिळालेल्या एका अनोळखी फोनमुळे हा कथित कट वेळेत उघडकीस आला आणि प्रवीण प्रकाश जगताप यांचा जीव वाचला.

हा प्रकार बारामती शहरातील जामदार रोड परिसरातील इंद्रप्रस्थ सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक 9 येथे घडल्याची माहिती आहे. 30 जुलै 2026 रोजी रात्री साडेअकरापासून 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी साडेअकराच्या दरम्यान ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रवीण प्रकाश जगताप (वय 41) हे भरत फोर्जमध्ये कार्यरत आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला असून त्यांना दोन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणात प्रवीण यांची पत्नी शर्मिला प्रवीण जगताप (वय 38) हिच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. तिने प्रवीण यांना गुंगीचे औषध दिल्यानंतर क्रिकेटच्या बॅटने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना घरातील हॉलच्या गॅलरीत तयार केलेल्या सिमेंटच्या चौकोनी कट्ट्यात पुरण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

आरोपानुसार, प्रवीण अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असताना त्यांना या बांधकामात झोपवण्यात आले. त्यानंतर वरून कडप्पा फरशी लावून कट्टा बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे पोलिसांमध्येही खळबळ उडाली.

डायल 112 वरील फोनमुळे कटाचा पर्दाफाश

दरम्यान, याच वेळी डायल 112 वर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. माहिती मिळताच पोलिसांनी विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे प्रवीण जगताप यांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांचा जीव वाचला.

या प्रकरणी प्रवीण यांचे वडील प्रकाश कान्होबा जगताप (वय 71) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 313/2026 अन्वये बीएनएस कलम 109(1) अंतर्गत शर्मिला प्रवीण जगताप हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेमुळे इंद्रप्रस्थ सोसायटीसह बारामती परिसरात चर्चेला उधाण आले आहे. पतीला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, बारामती शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबंधित सामग्री

 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर; ‘I am a good fool’ वाक्याने चर्चेला उधाण

लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर; ‘I am a good fool’ वाक्याने चर्चेला उधाण

लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर आले. ‘I am a good fool’ या वाक्यामुळे चर्चेला उधाण आले असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

Sep 16, 2026
छत्रपती संभाजीनगर मध्ये लग्नाचा तगादा अन् धमक्यांनी घेतला जीव? तरुणीच्या आत्महत्येनंतर संशयिताला अटक

छत्रपती संभाजीनगर मध्ये लग्नाचा तगादा अन् धमक्यांनी घेतला जीव? तरुणीच्या आत्महत्येनंतर संशयिताला अटक

लग्नासाठी वारंवार फोन करून दबाव आणि धमक्या दिल्याच्या आरोपानंतर गोंदेगावातील १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. सोयगाव पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर १० तासांत करण वाघला अटक केली.

Sep 12, 2026
मुंबई पोलिसांचा ₹6.41 कोटींचा पेरोल घोटाळा; मुख्य सूत्रधार अजय राठोड दहिसरमधून अटक

मुंबई पोलिसांचा ₹6.41 कोटींचा पेरोल घोटाळा; मुख्य सूत्रधार अजय राठोड दहिसरमधून अटक

मुंबई पोलिसांच्या उत्तर प्रादेशिक विभागातील ₹6.41 कोटींच्या पेरोल घोटाळ्यात मुख्य लिपिक अजय राठोडला गुन्हे शाखेने दहिसरमधून अटक केली. न्यायालयाने त्याला १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.

Sep 09, 2026
नागपुरात डान्स क्लासच्या वादातून पत्नीचा मृत्यू; मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक

नागपुरात डान्स क्लासच्या वादातून पत्नीचा मृत्यू; मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक

नागपुरात कौटुंबिक वादाचे रूपांतर हिंसक घटनेत होऊन 38 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Sep 05, 2026