Marriage Pressure

छत्रपती संभाजीनगर मध्ये लग्नाचा तगादा अन् धमक्यांनी घेतला जीव? तरुणीच्या आत्महत्येनंतर संशयिताला अटक

लग्नासाठी वारंवार फोन करून दबाव आणि धमक्या दिल्याच्या आरोपानंतर गोंदेगावातील १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. सोयगाव पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर १० तासांत करण वाघला अटक केली.

छत्रपती संभाजीनगर मध्ये लग्नाचा तगादा अन् धमक्यांनी घेतला जीव? तरुणीच्या आत्महत्येनंतर संशयिताला अटक

Marriage Pressure

गोंदेगावातील घटनेने खळबळ; करण अनिल वाघला न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी

छत्रपती संभाजीनगर : लग्नासाठी सातत्याने फोन करणे, घरापर्यंत जाऊन दबाव आणि धमक्या दिल्याचा आरोप असलेल्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला वेग देत गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १० तासांत निंभोरा येथील करण अनिल वाघ याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निंभोरा (ता. सोयगाव) येथील करण अनिल वाघ हा गेल्या काही दिवसांपासून संबंधित तरुणीला फोन करून लग्नासाठी आग्रह करत होता. फोनवरील संपर्कापुरता हा प्रकार मर्यादित राहिला नाही. तो तरुणीच्या घरीही जात असल्याचे आणि लग्नासाठी तिच्यावर दबाव टाकत धमकावत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या सततच्या त्रासामुळे तरुणी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि भयभीत झाली होती. करण वाघ याच्याकडून होत असलेल्या धमक्या व छळाला कंटाळून बुधवारी रात्री तिने गोंदेगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. १९ वर्षांच्या तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत तरुणीच्या मामाने पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार करण अनिल वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दहा तासांत गुरुवारी रात्री निंभोरा येथून करण वाघ याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

दरम्यान, शुक्रवारी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने करण वाघ याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तरुणीला नेमक्या कोणत्या प्रकारे त्रास दिला गेला, धमक्यांचे स्वरूप काय होते आणि या प्रकरणाशी संबंधित अन्य काही बाबी आहेत का, याचा तपास सोयगाव पोलीस करत आहेत.

संबंधित सामग्री

 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026
निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

नाशिक धर्मांतर प्रकरणातील निदा खानसमोर वैवाहिक संकट. आठ महिन्यांची गर्भवती असताना पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून १६ ऑक्टोबरला कोर्टात हजेरी आहे.

Oct 04, 2026

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज

मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.

Sep 24, 2026
दोन बहिणींचा संशयास्पद मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी आधीच काढून ठेवले होते 15 हजार रुपये!

दोन बहिणींचा संशयास्पद मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी आधीच काढून ठेवले होते 15 हजार रुपये!

Goa Sisters Suicide Case: दक्षिण गोव्यातील काणकोण परिसरात एकाच घरात दोन वृद्ध बहिणी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. 70 आणि 73 वर्षांच्या या दोन्ही बहिणी अनेक वर्षांपासून एकत्र राहत होत्या.

Sep 23, 2026