दहावी निकाल

दहावीचा निकाल विभागात हिंगोली जिल्हा शेवटच्या स्थानावर

10th Exam Result: हिंगोली जिल्ह्यातील दहावीचा निकाल 83.26% आला आहे, त्यात 13184 विद्यार्थ्यांनी उत्तीर्णता प्राप्त केली आहे. परभणी जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 90.02% आहे.

दहावीचा निकाल विभागात हिंगोली जिल्हा शेवटच्या स्थानावर

10th Exam Result

 

हिंगोली जिल्ह्याचा  निकाल ८३.२६ टक्के; जिल्ह्यातील १३ हजार १८४ विद्यार्थी झाले उत्तीर्ण

हिंगोली (10th Exam Result) : दहावी परिक्षेचे निकाल ८ मे रोजी सकाळी ११.३० वाजता जाहीर झाला. यंदा जिल्ह्याचा निकाल गतवर्षीपेक्षा ९.५६ टक्क्यांनी घटला असून ८३.२६ टक्के निकाल लागला आहे. छत्रपती संभाजी नगर विभागात जिल्हा शेवटच्या क्रमांकावर कायम आहे. प्रथम क्रमांकावर परभणी जिल्ह्याचा निकाल ९०.०२ टक्के लागला आहे.  जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्याचा निकाल अव्वलस्थानी आहे. तालुक्याचा निकाल ८७.४३ टक्के लागला आहे. त्या पाठोपाठ हिंगोली तालुक्याचा निकाल ८४.१३ टक्के, कळमनुरी तालुका ८२.६२ टक्के, सेनगाव तालुका ८२.५९ तर वसमत तालुक्याचा निकाल ८१.४५ टक्के लागला आहे. यावर्षी १५८३४ विद्यार्थ्यांनी परिक्षा (10th Exam Result) दिली असता १३ हजार १८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये २७६९ विद्यार्थी विशेष प्राविण्यात उत्तीर्ण झाले आहेत.

८ मे रोजी माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल जाहिर झाला. (10th Exam Result) विभागाचा एकंदरीत निकाल पाहता ८८.४१ टक्के निकाल लागला आहे. सर्वाधिक निकाल परभणी जिल्ह्याचा ९०.०२ टक्के लागला आहे. दहावीच्या परिक्षेत जिल्ह्यातील १६ हजार ७६ विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये प्रवेश घेतला होता. यापैकी १५ हजार ८३४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यातील १३ हजार १८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

तालुका निहाय दहावीचा निकाल 
शिक्षण विभागाच्या वतीने माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता जाहीर केला आहे. जिल्ह्याचा निकाल ८३.२६ टक्के लागला असून तालुका निहाय निकालाची आकडेवारी पाहिली असता औंढा नागनाथ तालुक्यात १९९४ विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये प्रवेश घेतला होता. त्यातील १९७४ विद्यार्थ्यांनी परिक्षा असता १७२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल ८७.४३ टक्के लागला आहे.
 
हिंगोली  तालुक्यामध्ये ३९३४ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यातील ३८७६ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असता ३२६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८४.१३ टक्के निकाल लागला आहे.  कळमनुरी तालुक्यामध्ये ३३०७ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यातील ३२७५ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असता २७०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८२.६२ टक्के निकाल लागला आहे. 

 वसमत तालुक्यामध्ये ४४४६ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यातील ४३९४ विद्यार्थ्यांनी परिक्षा (10th Exam Result) दिली असता ३५७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८१.४५ टक्के निकाल लागला आहे. सेनगाव तालुक्यामध्ये २३९५ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यातील २३१५ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असता १९१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८२.५९ टक्के निकाल लागला आहे. औंढा नागनाथ तालुक्यामध्ये १९९४ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यातील १९७४ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असता १७२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८७.४३ टक्के निकाल लागला आहे. 

यंदाही मुलींनी मारली बाजी
८ मे रोजी माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल जाहिर झाला. जिल्ह्याचा निकाल ८३.२६ टक्के लागला आहे. निकालामध्ये मुलींनी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी पाहिली असता यंदाही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींची टक्केवारी ८९.९७ टक्के आहे तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ७७.३५ आहे. तालुका निहाय हिंगोली मुली ८९.८८ तर मुले ७८.७२, कळमनुरी मुली ८९.२१ तर मुले ७६.८४, वसमत मुली ९०.४४ तर मुले ७४.४९, सेनगाव मुली ८६.०४ तर मुले ७९.६३, औंढा नागनाथ तालुका मुली ९४.५१ तर मुले ७९.८५ टक्के उत्तीर्णतेची टक्केवारी आहे.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026