हिंगोली फटाका अग्निकांड

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident

हिंगोली (Hingoli Firecracker Fire Incident) : सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर केली आहे. इतर पक्षाच्या नेत्यांनी मात्र केवळ भेटी देण्याचे सोपस्कार पार पाडले.

कठीण प्रसंगी रस्त्यावर उतरून जनतेची मदत करण्याची परंपरा शिवसेनेने हिंगोलीत या घटने दरम्यान चोखपणे पार पाडली. फटाक्यांच्या अवैध साठ्यामुळे भडकलेली आग जीवघेणी झाली असताना शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांनी स्वतः हातात पाईप धरून पाण्याचा मारा करीत होते. त्यांच्या खांद्याला खांदा लावून हिंगोली नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष अ.माबुद बागवान, नगरसेवक कपिल खंडेलवाल, नाना नायक, भरत पहेलवान यांच्यासह इतर नगरसेवकही आग विझविण्यात पुढे होते. या (Hingoli Firecracker Fire Incident) अग्निकांडात हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके हा कर्मचारी लातूर येथे उपचारा दरम्यान दगावला. तर अन्य दोन गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांच्यावरही लातूर येथे उपचार सुरू आहे. या तिघांना प्रत्येकी एक लाख रुपये शिवसेनेच्या नगराध्यक्ष रेखा श्रीराम बांगर यांनी घटनेच्या दुसर्‍याच दिवशी जाहीर केले. यानंतर बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मयतांना प्रत्येकी पाच लाख रुपये जाहीर केले. 

याशिवाय शासनाकडूनही मदत देण्याचे आश्वासन शिवसेना पक्षाध्यक्षांनी दिले. (Hingoli Firecracker Fire Incident) जळीत कांडानंतरच्या दोन दिवसांत  बुधवारी पालकमंत्री नरहरी झिरवळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यसभा सदस्य रामराव वडकुते, विधान परिषद सदस्य प्रज्ञा सातव या राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पीडितांची कोरडी विचारपूस केली. यापैकी एकाही नेत्याने काही भरीव आर्थिक मदत जाहीर केली नाही. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोपू पाटील, संदेश देशमुख, वसीम पठाण, गणेश शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जळीत ग्रस्त ठिकाणी केवळ भेट देऊन सोपस्कार पूर्ण केले.याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनाही या पीडितांची भेट घेण्याचे सौजन्य दाखविता आले नाही.

 राजकीय पक्षांच्या पुढार्‍यांनी दिलेल्या भेटी म्हणजे मनापासून केलेली काळजी होती की, आपापल्या पक्षाची मार्केटिंग, असा प्रश्न आता शहरातील नागरिक उपस्थित करीत आहेत