हिंगोली अग्रवाल समाज

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society

 

जयंतीसाठी जमा झालेली संपूर्ण रक्कम जखमी कृष्णा अग्रवाल यांच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय

हिंगोली (Hingoli Aggarwal Society) : शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले. यामध्ये श्री महाराजा अग्रसेन सेवा समितीचे सदस्य कृष्णा बजरंगलाल अग्रवाल हे अतिशय गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.

या कठीण प्रसंगी हिंगोलीतील अग्रवाल समाजाने एकतेचा आणि माणुसकीचा मोठा आदर्श घालून दिला आहे. या (Hingoli Aggarwal Society) घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजाने यंदाच्या महाराजा श्री अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जयंतीसाठी जमा झालेली संपूर्ण रक्कम जखमी चि. कृष्णा अग्रवाल यांच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुंबाला देण्याचे ठरवले आहे. अडचणीच्या काळात समाजाने दाखवलेली ही एकजूट हीच खरी एकता आणि संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. कृष्णा अग्रवाल हे लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावेत यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी असे आवाहन अग्रवाल समाज हिंगोलीच्या वतीने करण्यात आले आहे.