हिंगोली फटाका साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock

हिंगोली (Hingoli Firecracker Stock) : शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केले. या संदर्भात हिंगोली तहसील कार्यालयाला या फटाक्यांच्या साठ्याबाबत माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. 

हिंगोली शहरातील मारवाडी गल्लीमध्ये एका घरात अनाधिकृत फटाक्यांचा साठा असताना त्याचा सोमवारी स्फोट झाला. ज्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर जवळपास १५ जण जखमी झाले. या घटनेमुळे प्रशासन अर्लट मोडवर आले. त्याच निमित्ताने लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीत एका गोदामात फटाक्यांचा साठा असल्याची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यावरून प्रभारी पोलिस निरीक्षक गफार शेख, पोउपनि राहूल घुले, असलम गारवे, सुधीर ठेंबरे यांच्या पथकाने ६ ऑक्टोंबर रोजी रात्री  १०.३० च्या सुमारास गोदामाची पाहणी केली. ज्यामध्ये जवळपास १ ट्रक भरून फटाक्यांचा साठा मिळून आला. सदर फटाक्यांचा साठा शाम अग्रवाल रा. एनटीसी हिंगोली यांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

७ ऑक्टोंबर रोजी हिंगोली ग्रामीण पोलिसांनी तहसील कार्यालयाला पत्र देऊन सदर फटाक्यांचा साठा ताब्यात घेतल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे यावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले जात आहे.