जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आरोग्य शिबिरात 135 रुग्णांची तपासणी

जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आरोग्य शिबिरात 135 रुग्णांची तपासणी

World No Tobacco Day

हिंगोली (World No Tobacco Day) : जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. 

दंत रोग तज्ञ व नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. फैसल खान यांच्या नेतृत्वाखाली मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग व मौखिक तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिरासह विविध आरोग्यविषयक जनजागृतीपर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. 

या शिबिरात एकूण 135 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान एका रुग्णाची बायोप्सी करण्यात आली, तर दोन रुग्णांवर आवश्यकतेनुसार मुख शस्त्रक्रिया डॉ. फैसल खान यांनी यशस्वीरित्या केली. 

या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, डॉ. गीते, डॉ. दीपक मोरे, डॉ. गोल कदम, डॉ. नितीन पुरोहित, डॉ. मनीष बगडिया, डॉ. शैलजा कुप्पास्वामी, डॉ. सतीश रूणवाल, डॉ. जायभये, डॉ. कंठे, डॉ. परदेशी, डॉ. स्नेहल नगरे, तालुका आरोग्य अधिकारी जोगदंड यांच्यासह शंकर तावडे, श्रीपाद गारुडी, आशा क्षीरसागर, ज्ञानेश्वर चौधरी, भारतभुषण रणवीर, आनंद साळवे, गंगाधर बोंगाने, अरबाज खान, एकलास खान पठाण, संदीप सोळंखे, शोएब शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित सामग्री

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
नळातून मीटरभराचा नाळू; कोरचीच्या ‘शुद्ध पाण्या’च्या दाव्याला धक्का!

नळातून मीटरभराचा नाळू; कोरचीच्या ‘शुद्ध पाण्या’च्या दाव्याला धक्का!

कोरचीच्या वार्ड क्रमांक १६ मध्ये नगरपंचायतीच्या नळातून मीटरभराचा नाळू निघाल्याचा प्रकार समोर आला असून, पाणीपुरवठ्याच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Sep 24, 2026
हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीच्या ग्रामीण पोलीस स्टेशन रोडवर नागरिकांच्या अंगावर धावणाऱ्या पिसाळलेल्या गायीला नगरपरिषदेच्या पथकाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर ताब्यात घेतले.

Sep 13, 2026