Nanded Earthquake

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड : नांदेड शहर व जिल्ह्यात काही ठिकाणी आज शनिवारी सकाळी 9.44 वाजताच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सदर धक्का जाणवल्यानंतर नागरिकांनी सुरक्षिततेसाठी बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारला. नांदेड शहरातील मालेगाव रोड, देगलूर नाका, श्रीनगर, कैलासनगर, कवठा सिडको, असर्जन आदी भागात भूकंपाचा धक्का जाणवला.

नांदेड व हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज शनिवार, दि. 10 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 07:46 व 09:43 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली आहे.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या अधिकृत माहितीनुसार, या भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे 3.3 व 4.5 इतकी नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावाजवळ असल्याचे समजते.

या भूकंपामुळे नांदेड जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही. जिल्हा प्रशासनाने तत्काळ परिस्थितीचा आढावा घेतला असून सर्व संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.

भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, भूकंपाचे धक्के जाणवल्यास तत्काळ सुरक्षितरीत्या घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन २ ते ४ ऑक्टोबरच्या सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Oct 01, 2026
अखेर 'त्या' 175 चौरस मीटर  जागेवरील टिनशेड नगरपालिकेने केले उद्ध्वस्त 

अखेर 'त्या' 175 चौरस मीटर  जागेवरील टिनशेड नगरपालिकेने केले उद्ध्वस्त 

Vasmat Municipal Council Action: नगर परिषदेच्या मालकीच्या 175 चौ.मी. जागेबाबत सुरू असलेल्या वादावर मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यानी निर्णायक कारवाई केली आणि नगरपरिषद प्रशासनाने टिनशेड काढून..

Sep 30, 2026
भूकंपापासून संरक्षणासाठी हिंगोलीत ‘स्टॅबल’ तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग

भूकंपापासून संरक्षणासाठी हिंगोलीत ‘स्टॅबल’ तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग

Hingoli Earthquake Protection: भूकंपाच्या धक्क्यांपासून जुन्या व असुरक्षित इमारतींचे संरक्षण करण्यासाठी सीएसआयआर-केंद्रीय भवन अनुसंधान संस्थान रुडकी यांनी विकसित केलेल्या स्टॅबल तंत्रज्ञानाचा हिंगोली

Sep 24, 2026