Drinking Water

नळातून मीटरभराचा नाळू; कोरचीच्या ‘शुद्ध पाण्या’च्या दाव्याला धक्का!

कोरचीच्या वार्ड क्रमांक १६ मध्ये नगरपंचायतीच्या नळातून मीटरभराचा नाळू निघाल्याचा प्रकार समोर आला असून, पाणीपुरवठ्याच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नळातून मीटरभराचा नाळू; कोरचीच्या ‘शुद्ध पाण्या’च्या दाव्याला धक्का!

Drinking Water

वार्ड क्र. १६ मध्ये धक्कादायक प्रकार; मागील वर्षी वार्ड क्र. ४ मध्येही नळातून नाळू निघाल्याचा प्रकार — तक्रारी, मोर्चे करूनही उपाययोजना नाहीत?

कोरची : नगरपंचायतीच्या पाणीपुरवठ्याच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वार्ड क्रमांक १६ मध्ये मदीना मोहुर्ले यांच्या घराजवळील नगरपंचायतीच्या नळातून एक मीटरपेक्षा अधिक लांबीचा नाळू निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नळाचे पाणी नेमके किती सुरक्षित आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

विशेष म्हणजे, मागील वर्षीही वार्ड क्रमांक ४ मध्ये नगरपंचायतीच्या नळातून असाच नाळू निघाल्याचा प्रकार घडला होता. वर्ष उलटूनही प्रशासनाने यातून धडा घेतला नाही का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नळाचे पाणी आरोग्याच्या दृष्टीने पिण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी नगरपंचायतीकडे अनेकदा केल्या. निवेदने देण्यात आली, मोर्चे काढण्यात आले; मात्र पाणीपुरवठा व्यवस्थेत ठोस सुधारणा झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

एकीकडे नागरिकांच्या नळातून प्रत्यक्ष नाळू निघत असल्याचे प्रकार समोर येत असताना, नगरपंचायतीकडून जिल्हाधिकाऱ्यांना गावात शुद्ध व पिण्यायोग्य पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती देण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नगरपंचायतीचा दावा आणि नागरिकांचा अनुभव यामध्ये नेमके सत्य काय, असा सवाल आता अधिक तीव्र झाला आहे.

नळातून नाळू निघतोय की ‘शुद्ध पाण्या’चा दावा? या प्रश्नाचे उत्तर नगरपंचायतीने नागरिकांसमोर द्यावे, अशी मागणी होत आहे. पाण्याचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत तपासावेत, तसेच जलवाहिनी आणि पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता व देखभाल तपासावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
चिखली तालुक्यात जलस्त्रोत, तलाव व प्रकल्पांतील अवैध पाणी उपशावर कडक बंदी

चिखली तालुक्यात जलस्त्रोत, तलाव व प्रकल्पांतील अवैध पाणी उपशावर कडक बंदी

Project illegal water supply: तालुक्यात पर्जन्यमान अपुरे झाल्यामुळे जलाशय, तलाव, नदी, कालवे व बंधाऱ्यांमधील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. आगामी काळात निर्माण होणाऱ्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026