Weather Alert

परभणी जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी; अतिवृष्टी, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा

भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार परभणी जिल्ह्यात दि. ३० जुलै वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अतिवृष्टीची शक्यता वर्तविल्याने जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी; अतिवृष्टी, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा

Weather Alert

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन; अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, नदी-नाल्यांपासून दूर राहण्याच्या सूचना

परभणी : भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार परभणी जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३० जुलै) वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अतिवृष्टीची शक्यता वर्तविल्याने जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणे व प्रवास टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजयसिंह चव्हाण यांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणे व प्रवास करणे टाळावे. नदी, नाले, ओढे, पूल, बंधारे तसेच सखल आणि पूरप्रवण भागात जाणे धोकादायक ठरू शकते. तसेच पाण्याचा प्रवाह असलेल्या रस्त्यांवरून किंवा पुलांवरून वाहन नेण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली, विद्युत खांबाजवळ किंवा मोकळ्या जागेत थांबू नये. जिल्ह्यातील नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन परभणी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली आहे. मुंबईसह काही भागांतून माघार; पुढील २-३ दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून परतण्याची शक्यता.

Oct 03, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026