परभणी घरफोडी आरोपी जेरबंद

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested

 

४ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त, तीन घरफोड्या उघड

परभणी (Parbhani Accused Arrested) : पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद करत ४ लाख ३२ हजाराचा मुद्देमाल जप्त करुन तीन घरफोड्या उघडकीस आनल्या आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील चोरी व घरफोडी गुन्ह्यांची माहिती घेत असताना सराईत घरफोडी करणारा आरोपी रमेश शिंदे वय ३० वर्षे रा. मंगरूळ ता. घनसांगवी जि. जालना हा त्याचे घरी आला असल्याच्या माहितीवरून स्था.गु.शा. पथकाने मंगरूळ, जि. जालना येथे जाऊन त्यास ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार संजय गायकवाड रा. भोकरदन, अमोल पवार रा. मंगरूळ जि. जालना यांचेसह पालम व चुडावा पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली.

त्याच्या कडून एकूण ३०.२० ग्रॅम सोन्याचे दागिने,  बाजारभावाप्रमाणे किंमत ४ लाख ३२ हजार २०० रुपये जप्त करण्यात आले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास मुद्देमालासह पोलीस ठाणे पालम येथे हजर करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि चंदनसिंह परिहार, श्रेपोउपनि मधुकर चटटे, पोलीस अंमलदार सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, रंगनाथ दुधाटे, नेताजी गीते, गजानन क्षीरसागर, हनुमान ढगे, विलास बहुरे यांनी केली.