भाईश्री रमेश ओझा

तरुणांनो व्यसनमुक्त व्हा, नामस्मरणाने जीवन समृद्ध करा

Bhaishree Ramesh Ojha: भाईश्री रमेश ओझा यांनी तरुणांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले आणि नामस्मरणाच्या शक्तीचे उदाहरण दिले.

तरुणांनो व्यसनमुक्त व्हा, नामस्मरणाने जीवन समृद्ध करा

Bhaishree Ramesh Ojha

भाईश्री रमेश ओझा यांचे तरुणांना साकडे 
कथेचा पाचवा दिवस

हिंगोली (Bhaishree Ramesh Ojha) : तरुणांनी तंबाखू, गुटखा, दारू यांसारख्या व्यसनांपासून दूर राहून परमेश्वराचे नामस्मरण करावे, त्यातूनच खरे सुख आणि समाधान मिळते, असे आवाहन प.पू. भाईश्री रमेश भाई ओझा यांनी सोमवारी 23 मार्च रोजी येथे केले.

येथील रामलीला मैदानावर  गजराज बाल गणेश मंडळाच्या पुढाकारातून प. पू.भाईश्री रमेश भाई ओझा यांचे  19 ते 25 मार्च दरम्यान श्रीमद भागवत कथेला सुरुवात झाली आहे.  हिंगोली येथे सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेमध्ये सोमवारी पाचव्या दिवशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विशेषतः तरुण पिढीला उद्देशून मार्गदर्शन करत व्यसनांच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकला.

तत्पूर्वी,  कथेचे मुख्य यजमान म्हणून स्व. मखनलाल गौड यांच्या स्मृती प्रित्यर्थ नंदकिशोर शर्मा हे असून, सोमवारी 23 मार्च रोजी लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल, अमित हेडा इंदुमती बांगर या दैनंदिन यजमान कडून ग्रंथाची पूजा अर्चना करण्यात आली. भाईश्री यांनी या यजमानाचे पुष्पमाला अर्पण आशीर्वाद दिले.

भाईश्री (Bhaishree Ramesh Ojha) बोलताना पुढे म्हणाले, आजच्या काळात अनेक तरुण तंबाखू, गुटखा, दारू यांसारख्या घातक व्यसनांच्या आहारी जात आहेत. या व्यसनांमुळे शरीराची प्रकृती बिघडते, मानसिक संतुलन ढासळते आणि आयुष्याचे नुकसान होते. केवळ व्यक्तीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंब या व्यसनांच्या परिणामामुळे दुःखी होते.

ते (Bhaishree Ramesh Ojha) पुढे म्हणाले की, व्यसनामुळे माणसाचे आरोग्य, आर्थिक स्थिती आणि सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात येते. त्यामुळे अशा चुकीच्या सवयींपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे. “व्यसनातून क्षणिक आनंद मिळतो, पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
याउलट, भगवंताचे नामस्मरण केल्यास मन शांत होते, विचार शुद्ध होतात आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. तर 
नामस्मरणामुळे आत्मिक समाधान लाभते व व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित भाविकांनीही या संदेशाचे मनापासून स्वागत केले. तरुणांनी व्यसनमुक्त जीवन जगून समाजासाठी आदर्श निर्माण करावा, असे आवाहन शेवटी भाईश्री यांनी केले.यावेळी दहा ते 15 हजार भाविकांनी लक्षनीय हजेरी लावली होती.

संबंधित सामग्री

प्रभू श्रीराम हाच जीवनाचा आराम: बालयोगी गोपाल महाराज 

प्रभू श्रीराम हाच जीवनाचा आराम: बालयोगी गोपाल महाराज 

Balayogi Gopal Maharaj: बालयोगी गोपाल महाराज यांनी रामनवमी निमित्त भारतीय संस्कृतीचे आदर्श म्हणून प्रभू श्रीरामचंद्राच्या जीवनाचे महत्व सांगितले.

Mar 27, 2026
भागवत कथा अमृतमय: पंचप्राणांचे गूढ आणि मानव जीवनाचा उद्धार करते 

भागवत कथा अमृतमय: पंचप्राणांचे गूढ आणि मानव जीवनाचा उद्धार करते 

Bhagavad Katha: रमेश भाई ओझा यांनी सांगितले की भागवत कथा मानव जीवनाला दिशा देते आणि आध्यात्मिक उद्धार करते.

Mar 25, 2026
हिंगोलीतील श्रीमद भागवत कथेत श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा भक्तिमय सोहळा

हिंगोलीतील श्रीमद भागवत कथेत श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा भक्तिमय सोहळा

श्रीमद् भागवत कथेनिमित्त रामलीला मैदानावर 22 मार्च रोजी भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

Mar 23, 2026
दुःखमय संसारात खरे सुख नाही, नित्यानंदाचा मार्ग भक्तीतच: भाईश्री रमेशभाई ओझा 

दुःखमय संसारात खरे सुख नाही, नित्यानंदाचा मार्ग भक्तीतच: भाईश्री रमेशभाई ओझा 

Srimad Bhagwat katha: संसारात सर्वत्र दुःख असताना आपण त्यालाच सुख समजतो, हीच माणसाची मोठी चूक आहे, असे परखड विचार मांडत प.पू. भाईश्री रमेशभाई ओझा यांनी श्रीमद भागवत कथेतून जीवनाचे गूढ उलगडले.

Mar 22, 2026
ईश्वराला अडचणी दाखविण्या ऐवजी अडचणींना तुमचा ईश्वर दाखवा: रमेश भाई ओझा

ईश्वराला अडचणी दाखविण्या ऐवजी अडचणींना तुमचा ईश्वर दाखवा: रमेश भाई ओझा

हिंगोलीतील भागवत कथेच्या दुसऱ्या दिवशी रमेश भाई ओझा यांनी अडचणींना ईश्वर दाखवण्याचे महत्व सांगितले.

Mar 20, 2026