मानोरा (Balayogi Gopal Maharaj) : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र हे भारतीय संस्कृतीचे आदर्श आहेत, संसारातील तापाने पोळलेल्या जीवाला खऱ्या अर्थाने प्रभू श्री रामचंद्राचे आदर्शवत चरित्र निश्चित प्रेरणादायी आहे. आपल्या जीवनामध्ये मंगल प्राप्त करून घ्यायचे असेल तर प्रभू श्रीरामचंद्राचे संपूर्ण जीवन चरित्र आचरण करण्याची गरज आहे. अर्थात राम हाच जीवनाचा आराम आहे. असे प्रतिपादन श्रीक्षेत्र आसोला खुर्द येथे परमहंस श्री सोमनाथ महाराज यांच्या समाधीस्थळी सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेत ह भ प श्री बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर (Balayogi Gopal Maharaj) यांनी २६ मार्च रोजी रामनवमी दिनी केले.
याप्रसंगी श्रीमद् भागवत कथेत श्री राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पुढे भागवताचार्य बालयोगी गोपाल महाराज महाराज म्हणाले की, प्रभू श्रीरामचंद्राचे चरित्र श्रवण करताना नित्य नवा पर्व अनुभव येत असतो. आदर्श पुत्र प्रभू श्रीराम, आदर्श पती प्रभू श्रीराम, आदर्श राजा प्रभू श्रीराम, आदर्श योद्धा प्रभू श्रीराम, भारतीय संस्कृतीचा आदर्शही प्रभू श्रीरामचंद्र हे सूत्र कधीही विसरता येणार नाही. धावपळीच्या या जीवनामध्ये प्रत्येक मानव मात्रा करिता यशस्वी जीवनाची आचारसंहिता म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र होय.
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांची चरित्र जीवनात आनंद करणारे आहे. तरुणांनी श्रीमद् भागवत कथेमधून श्रीनारायण भगवान श्रीकृष्ण आणि राम कथेतून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम चंद्राच्या गुणांचे बोध घ्यावा, असे (Balayogi Gopal Maharaj) महाराजांनी श्रीमद् भागवत कथा श्रवण करणाऱ्या हजारो भाविकांना उद्देशून सांगितले.
प्रभू श्रीराम हाच जीवनाचा आराम: बालयोगी गोपाल महाराज
Balayogi Gopal Maharaj: बालयोगी गोपाल महाराज यांनी रामनवमी निमित्त भारतीय संस्कृतीचे आदर्श म्हणून प्रभू श्रीरामचंद्राच्या जीवनाचे महत्व सांगितले.
Balayogi Gopal Maharaj
संबंधित सामग्री
दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.
विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे!
शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी शिक्षकांनी भौतिक सुविधांपेक्षा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर भर देत बुलढाणा जिल्ह्याला देशातील टॉप ५ मध्ये नेण्याचे आवाहन केले.
सोमनाथ मंदिर देशाच्या आत्म्याचे प्रतीक: राज्यपाल जिष्णु देव वर्मा
Somnath Temple: सोमनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सनातन परंपरेच्या आत्म्याचे प्रतीक
स्वच्छता कामगारांनी वेळेत कामावर हजर राहावे, अन्यथा कठोर कारवाई
Shri Ram Bangar: नगरपरिषद गटनेते श्रीराम बांगर यांनी स्वच्छता कामगारांना वेळेवर कामावर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
टी. राजा सिंह यांच्या वक्तव्यांमुळे राज्यात नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.