भागवत कथा अमृतमय

भागवत कथा अमृतमय: पंचप्राणांचे गूढ आणि मानव जीवनाचा उद्धार करते 

Bhagavad Katha: रमेश भाई ओझा यांनी सांगितले की भागवत कथा मानव जीवनाला दिशा देते आणि आध्यात्मिक उद्धार करते.

भागवत कथा अमृतमय: पंचप्राणांचे गूढ आणि मानव जीवनाचा उद्धार करते 

Bhagavad Katha

प. पू. रमेश भाई ओझा यांचे प्रतिपादन

हिंगोली (Bhagavad Katha) : भागवत कथा ही केवळ धार्मिक ग्रंथ नसून ती जीवनाला दिशा देणारे अमृत आहे, असे प्रतिपादन प. पू. रमेश भाई ओझा यांनी बुधवारी कथा समाप्ती वेळी आपल्या प्रवचनात केले. हिंगोली येथील रामलीला मैदानावर गजराज बाल गणेश मंडळाच्या पुढाकारातून बुधवारी प. पू. भाईश्री रमेश भाई ओझा यांचे श्रीमद भागवथा समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी रमेशचंद्र अग्रवाल, निकुंज अग्रवाल, कालवाडिया  परिवार, कैलास चंद्र खंडेलवाल यांच्या वतीने ग्रंथाची पूजा करून भागवत कथेला सुरुवात करण्यात आली.

 भाईश्री बोलताना म्हणाले, भागवत श्रवण (Bhagavad Katha) केल्याने मनुष्याचे जीवन पवित्र होत असून त्याचा आध्यात्मिक उद्धार होतो, असे त्यांनी सांगितले. प्रवचना दरम्यान मानव शरीरातील पंचप्राण आणि पंच उपप्राण यांचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे स्पष्ट करण्यात आले. शरीरात प्राणशक्ती नसल्यास कोणतीही हालचाल अशक्य आहे. हीच प्राणशक्ती सर्व सजीवांमध्ये यात कीटक, पशु, पक्षी, समान स्वरूपात अस्तित्वात आहे. मात्र, प्राणशक्ती कमी होत गेल्यास शरीराची ताकदही क्षीण होत जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे भाईश्री म्हणाले, पंचप्राणांचे कार्य वेगवेगळे असून ते शरीराच्या विविध क्रियांना नियंत्रित करतात. त्यामध्ये रक्त शुद्ध करून ते संपूर्ण शरीरात पोहोचवण्याचे कार्यही समाविष्ट आहे. विशेषतः हृदयासारखे महत्त्वाचे अवयव जन्मापासून अखंड कार्यरत असतात, ही परमेश्वराच्या अद्भुत रचनेची साक्ष असल्याचे नमूद करण्यात आले. यावेळी आधुनिक विज्ञानाशी तुलना करताना, परमेश्वराची सृष्टी आणि रोबोटिक तंत्रज्ञान यामध्ये मोठा फरक आहे, असे सांगण्यात आले. रोबोट हा यांत्रिक पद्धतीने तयार केलेला असून त्याचे हसणे-रडणे हे कृत्रिम असते. परंतु मानवातील भावना, चेतना आणि प्राणशक्ती ही दैवी देणगी आहे, जी कोणत्याही यंत्रात निर्माण करता येत नाही.

तसेच, मानव शरीर आणि देवत्व यातील भेद स्पष्ट करताना सांगण्यात आले की, मानव शरीर हे लोखंडासारखे आहे तर देवत्व हे चांदीसारखे तेजस्वी आहे. पारस मणीच्या स्पर्शाने जसे लोखंडाचे सोने होते, तसेच भागवत कथा आणि परमेश्वर भक्तीमुळे मानवाचे जीवन परिवर्तन घडते, असा सुंदर दृष्टांत देण्यात आला. या (Bhagavad Katha) प्रवचनातून भाविकांना जीवनातील आध्यात्मिक मूल्यांची जाणीव करून देत भागवत श्रवण, नामस्मरण आणि सदाचार यांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यकर्त्यांनी काढला सामूहिक फोटो
मागील पंधरा ते विस दिवसापासून गजराज बाल गणेश मंडळासह इतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कथा संपल्यानंतर भाईश्री सोबत सामूहिक फोटो घेतला.

संबंधित सामग्री

प्रेमानंद महाराजांचे आश्रम पुन्हा चर्चेत; मुलगा आणि महिला बेपत्ता...?

प्रेमानंद महाराजांचे आश्रम पुन्हा चर्चेत; मुलगा आणि महिला बेपत्ता...?

Premanand Maharaj Ashram: प्रेमानंद महाराजांच्या राधा केलि कुंज आश्रमाशी संबंधित काही घटनांमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आश्रमात आलेला 17 वर्षीय अनुज चौधरी हा मुलगा बेपत्ता झाल्याचा दावा

Oct 04, 2026
दादासाहेब हे संत कुलगुरू होते : कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर

दादासाहेब हे संत कुलगुरू होते : कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर

दिंडी, प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून सामान्य माणसाला विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालत जीवन जगण्याचा नवा मार्ग दाखविण्याचे प्रबोधन स्व. दादासाहेब काळमेघ यांनी केले.

Jul 30, 2026
हिंगोलीत जय जगन्नाथ च्या जयघोषात इस्कॉनचा जगन्नाथ रथयात्रा महोत्सव संपन्न

हिंगोलीत जय जगन्नाथ च्या जयघोषात इस्कॉनचा जगन्नाथ रथयात्रा महोत्सव संपन्न

Jagannath Rath Yatra Festival: इस्कॉन शाखेच्या वतीने श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे  आयोजन १९ जुलै रविवार रोजी करण्यात आले. सर्व भक्त-भाविकांनी या उत्सवात हरे कृष्णा  हरे रामा व हरिबोल

Jul 19, 2026
मानसरोवर कैलास पर्वत यात्रेसाठी कालीदास महाराज देशमुख यांची निवड; परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने करण्यात येते नियोजन

मानसरोवर कैलास पर्वत यात्रेसाठी कालीदास महाराज देशमुख यांची निवड; परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने करण्यात येते नियोजन

तालुक्यातील मासरूळ येथील ह.भ.प. कालीदास महाराज देशमुख यांची चीनच्या तिबेट या स्वायत्त भागातील मानसरोवर कैलास पर्वत यात्रेसाठी निवड झाली आहे.

Jul 05, 2026
सोमनाथ मंदिर देशाच्या आत्म्याचे प्रतीक: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

सोमनाथ मंदिर देशाच्या आत्म्याचे प्रतीक: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

Somnath Temple: सोमनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सनातन परंपरेच्या आत्म्याचे प्रतीक

May 12, 2026