श्रीमद् भागवत कथा

ईश्वराला अडचणी दाखविण्या ऐवजी अडचणींना तुमचा ईश्वर दाखवा: रमेश भाई ओझा

हिंगोलीतील भागवत कथेच्या दुसऱ्या दिवशी रमेश भाई ओझा यांनी अडचणींना ईश्वर दाखवण्याचे महत्व सांगितले.

ईश्वराला अडचणी दाखविण्या ऐवजी अडचणींना तुमचा ईश्वर दाखवा: रमेश भाई ओझा

Shrimad Bhagwat Katha

हिंगोलीतील श्रीमद् भागवत कथेचा दुसरा दिवस

हिंगोली () : 'ईश्वराला तुमच्या अडचणी दाखविण्या ऐवजी अडचणींना तुमचा ईश्वर दाखवा, कोणतेही संकट तुमचे मार्ग अडवू शकणार नाही', असे प्रतिपादन जगविख्यात कथावाचक भाईश्री रमेश भाई ओझा यांनी भागवत कथे दरम्यान केले. हिंगोलीत गजराज बाल गणेश मंडळातर्फ आयोजित (Shrimad Bhagwat Katha) भागवत कथेच्या दुसऱ्या दिवशी भाईश्री रमेश भाई ओझा कथन करीत होते.

आपला संकल्प जर सत्य असेल तर ईश्वर त्याला निश्चित आशीर्वाद देतो आपला मार्ग नीती आणि धर्माचा असेल तर कोणतेही संकट मार्ग आवरुद्ध करू शकत नाही असा विश्वास भाई श्री रमेश भाई ओझा यांनी व्यक्त केला. याचा अर्थ आपली जबाबदारी ईश्वरावर सोडून आपण मोकळे होऊ शकत नाही आपण संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू केला तर ईश्वर आपल्याला बळ देतो, असे ते म्हणाले.

आजच्या परिस्थितीवर बोलताना भाईश्री रमेश भाई
ओझा म्हणाले, विश्वास हा भक्तीचा आधार आहे. हल्ली प्रत्येकाचा एकमेकांवरील विश्वास कमी होत चालला आहे, त्यामुळे मानसिक शक्तीचा ऱ्हास होत आहे. आत्मविश्वास कमी झाल्याने नव्या पिढीत डिप्रेशन सारखे आजार बळावत आहेत यातूनच आत्महत्या सारखे प्रकारही असल्याचे भाई श्री म्हणाले, वाढत श्रीमद्भ भागवत आपली आंतरिक शक्ती वाढविण्याचे सर्वोत्कृष्ट
साधन असल्याचे ते म्हणाले.

श्रीमद् भागवत कथा (Shrimad Bhagwat Katha) दरम्यान भाई श्री रमेश भाई ओझा यांच्या भजनांवर अनेक वेळा भाविकांनी ठेका धरला. शनिवारी कथेच्या तिसऱ्या दिवशी नित्यकथा होणार असून या या कथेचे विविध धार्मिक वाहिन्यांवरून थेट प्रसारण सुरू आहे. दरम्यान कथा, सत्संगांतून अनेकाचे मन शुध्द होते. यामुळे विचार बदलण्याचे सामर्थ्य देखील कथेमध्ये आहे. महाभारतात धृतराष्ट्राची विचारधार स्वार्थ बुध्दीची आहे. धृतराष्ट्र नेहमी आपल्या मुलांना राजा कसे होता येईल याचाच विचार करत होते, असे त्यांनी सांगितले. ज्याची दृष्टी नष्ट झाली, तो असा विचार करतो, जे स्वार्थी असतात ते अधर्माकडे वळल्या जातात असे त्यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026