दुचाकी चोरीच्या घटना सुरूच; घोडा शिवारातून दुचाकी चोरी

कळमनुरी तालुक्यातील विविध भागात दुचाकी चोरीच्या घटना वरचेवर घडत आहेत.

दुचाकी चोरीच्या घटना सुरूच; घोडा शिवारातून दुचाकी चोरी

Vehicle Theft

आखाडा बाळापूर (Vehicle Theft) : कळमनुरी तालुक्यातील विविध भागात दुचाकी चोरीच्या घटना वरचेवर घडत आहेत. यामुळे या भागात दुचाकी चोरी करणारी टोळी सक्रिय झाली असल्याची चर्चा होत आहे. मागील काही महिन्यांत दुचाकी चोरीच्या आठ घटना घडल्या आहेत. घोडा शिवारातून एक दुचाकी चोरी झाल्याप्रकरणी २९ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

कळमनुरी तालुक्यातील कृष्णापूर येथील सुरेश रमेश बुरकुले यांनी त्यांची दुचाकी घोडा शिवारात कालवा ओढ्याजवळ उभी केली होती. १४ मे रोजी ५० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत अज्ञात आरोपीविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात २९ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून बिटप्रमुख राजेश घोंगडे पुढील तपास करत आहेत.

विशेष म्हणजे यापूर्वी ७ मे रोजी कळमनुरी तालुक्यातील घोळवा रस्त्यावरील हॉटेलसमोर किशोर रत्नाकर मिरासे यांनी उभी करून ठेवलेली ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली होती. तसेच खरवड येथील प्रकाश गौतम कांबळे यांनी त्यांची दुचाकी सासरवाडीत बउर घराजवळ उभी केली असता अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. याबाबत २१ मे रोजी बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यापूर्वी बोल्डा आठवडी बाजारात झाडाखाली उभी केलेली दुचाकी चोरीस गेली होती. तसेच जांब येथील सोनाजी तुकाराम टारफे यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी जांब शिवारात उभी केली असता १२ सप्टेंबर रोजी सकाळी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. जामगव्हाण येथील दुचाकी वारंगाफाटा आठवडी बाजारातून चोरीस गेली होती.

उचाडा (ता. हदगाव) येथील शेतकरी ज्ञानेश्वर खंडोजी चव्हाण यांनी कृष्णापूर मंदिर परिसरात २५ ऑगस्ट रोजी ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी उभी केली असता ती चोरीस गेली होती. शोध घेऊनही दुचाकी मिळाली नाही. यामुळे २२ सप्टेंबर रोजी या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तसेच कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील राजू बंसी चव्हाण यांनी २३ सप्टेंबर रोजी आपल्या नातेवाईकांच्या घरासमोर उभी करून ठेवलेली ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याबाबत २५ सप्टेंबर रोजी आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा अनेक दुचाकी चोरीच्या घटना सतत घडत आहेत.

विविध भागांत दुचाकी चोरीच्या घटना

यापूर्वी आखाडा बाळापूर व कळमनुरी शहरासह डोंगरकडा, वारंगाफाटा, कामठाफाटा, वरूड, जवळापांचाळ आणि इतर भागांतही दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. मध्यंतरी दुचाकी चोरीच्या घटना कमी झाल्या होत्या. मात्र, मागील काही महिन्यांत दुचाकी चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र दिसून येत आहे.

संबंधित सामग्री

पीडित कुटुंबाला जिल्हाधिकाऱ्यांचा धीर

पीडित कुटुंबाला जिल्हाधिकाऱ्यांचा धीर

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आखाडा बाळापूर येथील ॲट्रॉसिटी प्रकरणातील मयत पंजाबराव मोरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मदत व सुरक्षेबाबत विचारपूस केली.

Sep 26, 2026
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; पुयना येथे युवकाचे पाण्याच्या टाकीवर बेमुदत आंदोलन

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; पुयना येथे युवकाचे पाण्याच्या टाकीवर बेमुदत आंदोलन

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील पुयना येथील लक्ष्मण टवले यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे.

Sep 05, 2026
रेडगाव येथून १ लाख रुपयाची मोटार सायकल चोरी; गुन्हा दाखल

रेडगाव येथून १ लाख रुपयाची मोटार सायकल चोरी; गुन्हा दाखल

Redgaon Car Theft: डोंगरकडा पोलीस चौकी अंतर्गत रेडगाव येथून घरासमोर उभी एक लाख रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली याबाबत आज आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

Sep 01, 2026
दांडेगाव शेत शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा

दांडेगाव शेत शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा

आखाडा बाळापूर येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दांडेगाव शेत शिवारात पोलिस पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

Aug 17, 2026
देशात वाहनचोरीचे प्रमाण चिंताजनक पातळीवर

देशात वाहनचोरीचे प्रमाण चिंताजनक पातळीवर

Vehicle theft case: देशात वाहनचोरीचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या (एनसीआरबी) २०२४ च्या आकडेवारीनुसार, देशात वर्षभरात २.३ लाखांहून अधिक वाहने चोरीला गेली..

Aug 13, 2026