वाहनचोरी प्रकरण

देशात वाहनचोरीचे प्रमाण चिंताजनक पातळीवर

Vehicle theft case: देशात वाहनचोरीचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या (एनसीआरबी) २०२४ च्या आकडेवारीनुसार, देशात वर्षभरात २.३ लाखांहून अधिक वाहने चोरीला गेली..

देशात वाहनचोरीचे प्रमाण चिंताजनक पातळीवर

Vehicle theft case

नवी दिल्ली (Vehicle theft case) : देशात वाहनचोरीचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या (एनसीआरबी) २०२४ च्या आकडेवारीनुसार, देशात वर्षभरात २.३ लाखांहून अधिक वाहने चोरीला गेली. म्हणजेच सरासरी दर २.३ मिनिटांनी एक वाहन चोरीला गेले. (Vehicle theft case) वाहनचोरीत दिल्ली आघाडीवर असून, बिहार आणि महाराष्ट्र त्यापाठोपाठ आहेत.

दिल्लीत ४०,१३९ वाहनचोरीच्या घटना नोंदल्या गेल्या. बिहारमध्ये २८,४११, तर महाराष्ट्रात २६,७८२ घटना घडल्या. त्यानंतर उत्तर प्रदेशात २०,३१५, राजस्थानमध्ये १७,३५३, हरियाणात १५,५७८ आणि मध्य प्रदेशात १४,६४४ वाहनचोरीच्या घटनांची नोंद झाली. कर्नाटकात ११,६५९, तेलंगणात ८,३३०, तामिळनाडूत ७,६६३, गुजरातमध्ये ७,०९४, ओडिशात ६,१८१, झारखंडमध्ये ५,९९५, आंध्र प्रदेशात ५,२०८ आणि छत्तीसगडमध्ये ४,२०४ वाहने चोरीला गेली.

आसाममध्ये २,७१२, पंजाबमध्ये २,६०२, उत्तराखंडमध्ये १,७००, केरळमध्ये १,७०१, मणिपूरमध्ये १,१४९, तर चंदीगडमध्ये १,३८७ वाहनचोरीच्या घटना (Vehicle theft case) नोंदल्या गेल्या. जम्मू-काश्मीरमध्ये ७५३, मेघालयात ५०२, पुदुच्चेरीत २४२, हिमाचल प्रदेशात २३२ आणि मिझोराममध्ये २१० घटना घडल्या. अरुणाचल प्रदेशात १९५, नागालँडमध्ये १६०, गोव्यात ९७, त्रिपुरात ७५, सिक्कीममध्ये पाच, तर अंदमान-निकोबारमध्ये तीन घटना नोंदल्या गेल्या. लडाखमध्ये दोन घटना घडल्या. लक्षद्वीपमध्ये एकही वाहनचोरी नोंदली गेली नाही.