वसमत नगर परिषद

वसमत नगर परिषद सर्वे नं. १८० प्रकरणात दोन आरोपी जाळ्यात

Vasmat Municipal Council: वसमत येथील नगरपालिकेच्या मालकीची सर्वे नंबर १८० मधील भूखंड बनावट कागदाच्या आधारे स्वतःच्या नावावर करून घेतल्याचे प्रकरण आता पेटले आहे या प्रकरणात गुन्हा दाखल

वसमत नगर परिषद सर्वे नं. १८० प्रकरणात दोन आरोपी जाळ्यात

Vasmat Municipal Council

 

तीन दिवसाची पोलीस कोठडी, चंदन महाल संकटात

वसमत (Vasmat Municipal Council) : वसमत येथील नगरपालिकेच्या मालकीची सर्वे नंबर १८० मधील भूखंड बनावट कागदाच्या आधारे स्वतःच्या नावावर करून घेतल्याचे प्रकरण आता पेटले आहे या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन आरोपी पोलिसांनी अटक केली आहेत हे आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता सोमवार पर्यंत पोलीस सुनावण्यात आली आहे त्यामुळे नगरपालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे चंदन महाल उभे करणारे व जागा विकणार्‍यांच्या तंबूमध्ये खळबळ उडालेली आहे.

 वसमत येथील सर्वे नंबर १८० मधील नगरपालिकेच्या मालकीची जागा भूखंड माफीयांनी  बनावट कागदपत्र बनवून रजिस्ट्री करून विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगरपालिकेला चंदन लावण्याचा हा प्रकार वसमत मध्ये चर्चेचा विषय झालेला आहे. या प्रकरणात नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांची बनावट सही करून खरेदीखत तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी वसमत पोलीस ठाण्यात २५ जून रोजी दोन आरोपी विरोधात  गुन्हा नोंदवण्यात आला होता.

त्यानंतर आरोपींनी अटकपूर्व जाणण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यात यश आले नाही अखेर उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्याने आरोपी पोलिसांच्या समोर हजर झाले आहेत दोन्ही आरोपींना पोलिसांनी वसमत न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने सोमवार पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी नगरपालिकेच्या वतीने कर्मचारी ज्ञानेश्वर  जाधव यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून देवानंद  साबळे रा. कोर्टा,व मंगेश नंदकिशोर पारवेकर (रा. ब्राह्मण गल्ली, वसमत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर वाघ करत आहेत. 

वसमत नगरपालिकेला चंदन लावणारे धास्तावले
नगरपालिकेच्या (Vasmat Municipal Council) जागेला बनावट कागदपत्र तयार करून चंदन लावणारे चंदन वाले व भूमाफिया आता धास्तावले असून ही जागा रिविजन रजिस्टर ला पहिल्यांदा खाजगी व्यक्तीच्यानावावर कशी लागली याचा शोध आता पोलीस घेत आहेत ,  सदर जमिनीची मोजणी करण्यासाठी ६ ऑगस्ट रोजी पथक आले होते मात्र पावसाअभावी मोजणी लांबवण्यात आली आहे या प्रकरणात अनेक मोठे मासे गळाला लागणार असल्याने वसमत तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे चंदनवाल्यांची वसमत तालुक्यात प्रचंड मोठी मालमत्ता उभी राहिलेली आहे वसमत नगरपालिकेच्या मालमत्तांवरही चंदन महाल उभे झाले आहेत त्याचीही चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

संबंधित सामग्री

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
अखेर 'त्या' 175 चौरस मीटर  जागेवरील टिनशेड नगरपालिकेने केले उद्ध्वस्त 

अखेर 'त्या' 175 चौरस मीटर  जागेवरील टिनशेड नगरपालिकेने केले उद्ध्वस्त 

Vasmat Municipal Council Action: नगर परिषदेच्या मालकीच्या 175 चौ.मी. जागेबाबत सुरू असलेल्या वादावर मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यानी निर्णायक कारवाई केली आणि नगरपरिषद प्रशासनाने टिनशेड काढून..

Sep 30, 2026
नागपुरात 500-600 बनावट दस्तनोंदणींचा आरोप; तात्काळ विभागीय चौकशीची युवक काँग्रेसची मागणी

नागपुरात 500-600 बनावट दस्तनोंदणींचा आरोप; तात्काळ विभागीय चौकशीची युवक काँग्रेसची मागणी

नागपुरातील दुय्यम निबंधक कार्यालय क्र. 5 आणि इतर कार्यालयांमध्ये 500-600 बनावट दस्तनोंदणी झाल्याचा युवक काँग्रेसचा आरोप असून तातडीने विभागीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

Sep 21, 2026
वसमत येथील तरुणाच्या खून प्रकरणाचा वसमत शहर पोलिसांनी लावला तपास

वसमत येथील तरुणाच्या खून प्रकरणाचा वसमत शहर पोलिसांनी लावला तपास

Vasmat youth murder case:  वसमत शहरातील  सुवर्णकार वसाहतीमध्ये राहणाऱ्या 33 वर्षीय तरुण अभिजीत शहाणे त्याच्या खून प्रकरणाचा शोध वसमत शहर पोलिसांनी लावण्यात यश मिळवले आहे

Sep 20, 2026